*प्रसंगी विरोधात बसू, पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही, प्रताप सरनाईकांची स्पष्ट भूमिका*
*प्रसंगी विरोधात बसू, पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही, प्रताप सरनाईकांची स्पष्ट भूमिका*
धाराशिव -सत्ता महत्त्वाची आहे, पण त्यामुळे पक्षात फूट पडू देणार नाही असं प्रताप सरनाईकांनी म्हटलं. तसचे धाराशिवमध्ये शिवसेनेतील एकजूट कायम ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
स्वार्थी राजकारणातून शिवसेनेतील एक गट आमच्यासोबत असल्याचा प्रचार करून काहीजणांकडून पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न होत आहे. हे कदापि सहन केले जाणार नाही, असं सरनाईकांनी सांगितलं.
आमदार तानाजी सावंत यांना वेगळे ठेवून शिवसेनेत मतभेद असल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचेही प्रताप सरनाईकांनी नमूद केले. मात्र आमचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना अखंड, अभेद्य आणि सशक्त आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करून पुढील राजकीय रणनीती ठरवली जाईल, असेही सरनाईक यांनी सांगितलं. तथाकथित स्वयंभू नेत्यांनी पक्षाच्या रणनीतीबाबत भाष्य करू नये