धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदी अर्चना पाटील बिनविरोध होणार

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदी अर्चना पाटील बिनविरोध होणार 
राहुल‌ कोरे आळणीकर 
धाराशिव : धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी सौ. अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू असून त्यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महायुतीतील पक्षांमध्ये एकमत झाल्याचे बोलले जात असल्यामुळे अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

जिल्हा परिषदेमध्ये उद्या 13 तारखेला सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली असून या सभेत अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडीकडे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, महायुतीतील घटक पक्षांमध्ये अंतर्गत चर्चा पूर्ण झाल्याची माहिती समोर येत असून अध्यक्षपदासाठी सौ. अर्चना पाटील यांच्या नावावर सहमती झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता अधिक बळावली आहे.

मात्र महायुतीमध्ये नेमका कोणता राजकीय फॉर्म्युला ठरला आहे, पदवाटपाबाबत कोणते समीकरण ठरले आहे याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. अध्यक्षपदाची निवड झाल्यानंतरच या राजकीय समीकरणाबाबत स्पष्टता येण्याची शक्यता आहे.
उद्याच्या सभेनंतर जिल्हा परिषदेत नव्या नेतृत्वाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता असून या घडामोडीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक