*भाजपा महिला मोर्चाच्या वतीने महिला सन्मान सोहळा व महिला संरक्षण कायदेविषयक मार्गदर्शन उत्सहात संपन्न*

*भाजपा महिला मोर्चाच्या वतीने महिला सन्मान सोहळा व महिला संरक्षण कायदेविषयक मार्गदर्शन उत्सहात संपन्न*
राहुल कोरे आळणीकर 
धाराशिव:- भारतीय जनता पार्टी, महिला मोर्चा धाराशिव तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमानाने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात "महिला सन्मान सोहळा व महिला संरक्षण कायदे विषयक मार्गदर्शन" विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सत्कार तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय धाराशिव येथे सपन्न झाला.

 भारतीय जनता पार्टी प्रदेश अध्यक्षा मा. आ. चित्राताई वाघ तुळजापूर विधानसभा आमदार राणाजगजितसिंह पाटील मा. उपाध्यक्षा,जिल्हा परिषद तथा लेडीज क्लबच्या अध्यक्षा, अर्चनाताई पाटील भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष, दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा,प्रिती कदम यांच्या पुढाकारातून करण्यात आले. 

या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती भारतीय जनता पार्टी महिला प्रदेश सचिव अ‍ॅड.संध्याताई राजपूत प्रमुख वक्ते अ‍ॅड.भाग्यश्री रणखांब यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.

आजच्या काळात महिलांची सुरक्षितता ही अत्यंत महत्त्वाची गरज बनली आहे. याच विषयावर उपस्थित महिलांशी दिलखुलासपणे संवाद साधत स्वसंरक्षण, आत्मविश्वास आणि सजगता याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

 यावेळी कार्यक्रमास प्रमुख मान्यवर भाजपा जिल्हा सरचिटणीस अस्मिता कांबळे मा. जिल्हा परिषद सदस्य उषाताई यरकळ जिल्हा चिटणीस, अंजलीताई बेताळे नूतन सभापती, गोकर्णा कदम, नगरसेविका अल्काताई पारवे, वैशाली सोनवणे, ग्रा. पं. सदस्य विद्या माने, सगुणाताई आचार्य, नयना वाघ मॅडम युवा मोर्चा सरचिटणीस शिवानी परदेशी, सुनिता गुंजाळ मॅडम, वडने मॅडम व महिला पदाधिकारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक