धाराशिव जिल्हा परिषदेत राजकीय घडामोडी; सदस्य सुवर्णा पाटील यांच्या सभापती पदावरून वंचित , पुत्र आनंद पाटील यांचा राजीनाम्याचा इशारा

धाराशिव जिल्हा परिषदेत राजकीय घडामोडी; सदस्य सुवर्णा पाटील यांच्या सभापती पदावरून वंचित , पुत्र आनंद पाटील यांचा राजीनाम्याचा इशारा
राहुल कोरे आळणीकर 

धाराशिव जिल्हा परिषदेत आज सभापती निवड प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर मोठ्या राजकीय घडामोडी घडल्याचे समोर आले आहे. सदस्य सुवर्णा सतीश पाटील यांचे नाव दुपारी बारा वाजून वीस मिनिटांपर्यंत सभापती पदासाठी निश्चित असल्याची माहिती होती. मात्र, ऐनवेळी काही घडामोडी घडून त्यांचे नाव बदलण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.
यासंदर्भात सुवर्णा पाटील यांचे पुत्र आनंद पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी आरोप केला की, काही व्यक्तींनी चुकीची माहिती देऊन व कानभरणी करून पक्षातील खऱ्या कार्यकर्त्यावर अन्याय केला आहे. त्यामुळे सभापती पद दुसऱ्या व्यक्तीकडे वळवण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
यापूर्वीही जिल्हा उपाध्यक्ष पदासाठी सुवर्णा पाटील यांचे नाव चर्चेत होते, मात्र त्यावेळीही ऐनवेळी बदल करण्यात आल्याची चर्चा होती. आजच्या सभापती निवड प्रक्रियेतही तसाच प्रकार घडल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर आनंद पाटील यांनी मोठा निर्णय घेत, जिल्हा परिषद सदस्य पदासह पक्षातील सर्व पदांचा राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे स्थानिक राजकारणात खळबळ उडाली असून पुढील राजकीय घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
..

धाराशिव जिल्हा परिषदेत वाद – सुवर्णा पाटील यांना डावलल्याचा आरोप, आनंद पाटील यांचा राजीनाम्याचा इशारा

#उस्मानाबादन्यूज #धाराशिवन्यूज #धाराशिव #उस्मानाबाद #अंतरसंवादन्यूज #उस्मानाबादन्यूज #DharashivNews #OsmanabadNews #ZillaParishad #PoliticalNews #MaharashtraPolitics #BreakingNews #ShivSena #LocalPolitics #MarathiNews

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक