धाराशिव जिल्हा परिषदेत अर्चनाताईंचा विजयाचा झेंडा! सामान्य महिलांच्या आशा पूर्ण — अर्चनाताई पाटील अध्यक्षपदी विराजमान. उषाताई रविंद्र गायकवाड यांची उपाध्यक्षपदी निवड

 धाराशिव जिल्हा परिषदेत अर्चनाताईंचा विजयाचा झेंडा! सामान्य महिलांच्या आशा पूर्ण — अर्चनाताई पाटील अध्यक्षपदी विराजमान 
उषाताई रविंद्र गायकवाड यांची उपाध्यक्षपदी निवड 
राहुल कोरे आळणीकर 
धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अखेर बहुप्रतिक्षित निकाल लागला असून माननीय अर्चनाताई पाटील यांची अध्यक्षपदी दणदणीत निवड झाली आहे. या निवडीमुळे जिल्ह्यातील राजकारणात नवे समीकरण निर्माण झाले असून महिलांच्या नेतृत्वाला नवी दिशा मिळाल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
अर्चनाताई पाटील या याआधी उपाध्यक्ष पदावर काम करत असताना त्यांनी जिल्ह्यातील ग्रामीण भाग, विशेषतः महिलांच्या प्रश्नांवर सातत्याने काम केले आहे. गावागावात महिलांशी संवाद साधणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि प्रशासनापर्यंत त्यांचा आवाज पोहोचवणे ही त्यांची काम करण्याची खास शैली राहिली आहे.
राजकारणातील सर्व समीकरणे आणि चर्चांना छेद देत अखेर सामान्य महिलांच्या अपेक्षा पूर्ण करत अर्चनाताई पाटील अध्यक्षपदी विराजमान झाल्या. त्यांच्या या निवडीमुळे जिल्ह्यातील महिला वर्गामध्ये आनंदाचे वातावरण असून “आपल्या प्रश्नांना आता खरे नेतृत्व मिळाले” अशी भावना व्यक्त होत आहे.
अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि महिला संघटनांनी अर्चनाताईंच्या निवडीचे स्वागत करताना सांगितले की,
“सामान्य महिलांच्या मनातील वेदना समजून घेणारे नेतृत्व जिल्हा परिषदेला मिळाले आहे.”
दरम्यान, अर्चनाताई पाटील यांच्या विजयामुळे जिल्हा परिषदेत नव्या विकासकामांना गती मिळणार असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. ग्रामीण भागातील पाणी, आरोग्य, शिक्षण आणि महिलांच्या सक्षमीकरणाच्या प्रश्नांवर त्यांचे लक्ष असणार असल्याची चर्चा सुरू आहे.
आता अर्चनाताईंच्या नेतृत्वाखाली धाराशिव जिल्हा परिषद विकासाच्या नव्या टप्प्यात प्रवेश करेल का? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक