अपघातात धाराशिव शहरातील समाजसेवक वाजिद पठाण यांचा मृत्यू
धाराशिव : शहरातील परिचित समाजसेवक वाजिद पठाण यांच्या मृत्यूची धक्कादायक घटना समोर आली आहे. तालुक्यातील बेंबळी गावाजवळील शिवाजीनगर परिसरात त्यांच्यासोबत अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
घटनानंतर त्यांना तातडीने शासकीय (जिल्हा) रुग्णालय, धाराशिव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, रुग्णालय प्रशासनाने त्यांना मृत घोषित केल्याची माहिती आहे. त्यांचा मृत्यू नेमका कधी झाला, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती उपलब्ध झालेली नाही.
दरम्यान, वाजिद पठाण हे मोटरसायकलवरून धाराशिवकडे येत असताना बोलेरो पिकअप वाहनाची धडक बसल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण काय, मोटरसायकलचा अपघात झाला का किंवा इतर कोणते कारण होते, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
या घटनेचा तपासानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या घटनेमुळे धाराशिव शहरात शोककळा पसरली आहे.