धाराशिव जि.प. शिवसेनेच्या उपगटनेतेपदी सुवर्णाताई सतीश पाटील जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवेळी शिवसेनेचे पारडे जड !

धाराशिव जि.प. शिवसेनेच्या उपगटनेतेपदी सुवर्णाताई सतीश पाटील 

जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवेळी शिवसेनेचे पारडे जड !
राहुल कोरे आळणीकर 
धाराशिव दि.१२ (प्रतिनिधी) - जिल्हा परिषदेत शिवसेना पक्षाच्या उपगटनेतेपदी सुवर्णाताई सतीश पाटील यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

सुवर्णाताई पाटील या शिवसेना युवासेना धाराशिव लोकसभा अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद पाटील यांच्या मातोश्री आहेत. पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रताप सरनाईक, आ प्रा डॉ तानाजी सावंत, संपर्क प्रमुख राजन साळवी, माजी खासदार प्रा रवींद्र गायकवाड व माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील शिवसेनेचे जाळे मजबूत करण्यासाठी महत्त्वाची जबाबदारी निभावली आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक भरगोस मतांनी त्यांनी विजयी मिळवला आहे.जिल्यातील आनंद पाटील यांच्या वाढत्या राजकीय प्रभाव मुळे युवक वर्ग त्याच्या सोबत आहे.त्यांचे काम पाहून ना. शिंदे यांनी त्यांच्या आई सुवर्णाताई पाटील यांची  
जिल्हा परिषदेत शिवसेना पक्षाच्या उपगटनेतेपदी निवड केली आहे. या निवडीमुळे जिल्हा परिषदेत शिवसेनेची भूमिका अधिक मजबूत होणार असल्याचे मानले जात आहे. शुक्रवारी होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावरही शिवसेना दावा करणार असून या संदर्भातील अंतिम निर्णय ना. एकनाथ शिंदे घेणार आहेत. अध्यक्षपदाच्या निवडीवेळी शिवसेनेचे पारडे जड राहणार असून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

उपगटनेते म्हणून सुवर्णाताई सतीश पाटील सभागृहात शिवसेना पक्षाची ध्येय-धोरणे प्रभावीपणे राबविण्याची जबाबदारी पार पाडणार आहेत. त्यांच्या निवडीच्या वेळी शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच पालकमंत्री प्रतापराव सरनाईक, आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत, संपर्क प्रमुख माजी आ. राजन साळवी, माजी खासदार प्रा रवींद्र गायकवाड आणि माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्यात शिवसेना एकसंघ व एकजुटीने काम करणार असल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. शुक्रवारी होणाऱ्या अध्यक्षपदाच्या उपाध्यक्ष निवडीकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक