तुळजाभवानी देवीला सव्वा दोन किलो चांदीची कळशी अर्पण

तुळजाभवानी देवीला सव्वा दोन किलो चांदीची कळशी अर्पण
तुळजापूर (प्रतिनिधी) : श्री तुळजाभवानी मंदिरात आज सकाळी पाथरी (जि. परभणी) येथील देवीचे निस्सीम भक्त वेदांत संजय कुलकर्णी यांनी सव्वा दोन किलो वजनाची चांदीची कळशी देवीच्या चरणी अर्पण केली.

वेदांत कुलकर्णी व त्यांच्या कुटुंबीयांनी सकाळी मंदिरात येऊन अत्यंत भक्तिभावाने श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांनी सुमारे सव्वा दोन किलो वजनाची चांदीची कळशी अर्पण करून आपली श्रद्धा व्यक्त केली.

या प्रसंगी मंदिर संस्थानच्या वतीने वेदांत कुलकर्णी व त्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विकास वाणी, महेश गंजे तसेच मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक