चोराखळीत पहाटे पिस्तूलधारी टोळीचा धुमाकूळ; कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरातून ९.५१ लाखांचा ऐवज लंपास

चोराखळीत पहाटे पिस्तूलधारी टोळीचा धुमाकूळ; कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरातून ९.५१ लाखांचा ऐवज लंपास
राहुल कोरे आळणीकर 
येरमाळा -परिसरातील चोराखळी येथे पहाटे सशस्त्र दरोड्याची धक्कादायक घटना घडली. कालिका सांस्कृतिक कलाकेंद्राच्या चालकाच्या घरी सहा अज्ञात इसमांनी घुसखोरी करून पिस्तूल व लोखंडी सुरा दाखवत कुटुंबीयांना धमकावले आणि तब्बल ९ लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास आरोपींनी घरात प्रवेश केला. त्यांनी घरातील सदस्यांना धाक दाखवत रोख रक्कम, दागदागिने व इतर मौल्यवान वस्तू हिसकावून घेतल्या. काही मिनिटांतच संपूर्ण प्रकार उरकून टोळी पसार झाली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून आरोपींच्या शोधासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आले आहे.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पुढील तपास सुरू आहे.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक