आ.राणाजगजीतसिंह पाटलांची रणनीती यशस्वीविषय समिती निवडीत देखील महायुतीची वज्रमूठ कायम ठेवण्यात यश..!भाजप कडे 2 तर शिवसेना,राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला पप्रत्येकी एक समिती.सर्व उमेदवारांना ४५ मते,मोठ्या मताधिक्याने महाविकास आघाडीचा पराभव.
आ.राणाजगजीतसिंह पाटलांची रणनीती यशस्वी
विषय समिती निवडीत देखील महायुतीची वज्रमूठ कायम ठेवण्यात यश..!
भाजप कडे 2 तर शिवसेना,राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला पप्रत्येकी एक समिती.
सर्व उमेदवारांना ४५ मते,मोठ्या मताधिक्याने महाविकास आघाडीचा पराभव.
राहुल कोरे आळणीकर
धाराशिव:.जनतेने जो विश्वास आपल्यावर टाकला आहे, त्यातून आपली जबाबदारी आता कैक पटीने वाढली आहे. या पदाला न्याय देण्यासाठी पूर्णवेळ योगदान देणे ही काळाची गरज असल्याचे असे प्रतिपादन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे. जिल्हा परिषदेच्या नूतन सभासदांचे अभिनंदन करून त्यांनी पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
राज्यात महायुतीचे सरकार असून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून जिल्ह्याच्या विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला जात आहे. आता जिल्ह्याच्या सत्तेतही आपण सहभागी असल्याने विकासाचा वेग अधिक वाढणार आहे. ग्रामीण भागातील सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी या सत्तेचा सकारात्मक वापर करून जिल्हा स्तरावर काही अडचणी आल्यास आपण स्वतः खंबीरपणे पाठीशी उभा असल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितले. आता विकास कामे करताना मात्र कोणतीही कसर राहणार नाही याची दक्षता सर्वांनीच घ्यावी असे आवाहनही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.
विरोधकांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला, मात्र मतदारांनी विकासाला आणि महायुतीच्या एकजुटीला कौल दिला. जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीप्रमाणेच सभापती पदाच्या निवडणुकीतही महायुतीची 'वज्रमूठ' अभेद्य असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे. भाजप हा जिल्ह्यातील सर्वात मोठा पक्ष असतानाही, मित्रपक्षांना सोबत घेऊन जाण्याचा शब्द आम्ही पाळला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महायुतीची एकजूट राखण्यात आम्हाला पूर्ण यश आले आहे. ही एकजूट केवळ राजकारणापुरती मर्यादित नसून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी काळाची गरज आहे. नगरपालिका आणि पंचायत समितीप्रमाणेच जिल्हा परिषदेतही महायुतीची वाटचाल भक्कम राहिली आहे. हा विजय म्हणजे सर्वसामान्य जनतेने महायुतीच्या कार्यपद्धतीवर दाखवलेला विश्वास असल्याचे सांगत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राआत्या पवार, पालकमंत्री प्रतापजी सरनाईक, आमदार तानाजी सावंत,माजी आमदार बसवराज पाटील,राहुल मोटे,ज्ञानराज चौगुले,सुजितसिंह ठाकूर,राजन साळवी,सुरेश बिराजदार,दत्ताभाऊ कुलकर्णी,नितीन काळे,महेंद्र धुरगुडे, अजित पिंगळे,मोहन पनुरे,यांच्यासह महायुतीतील सर्व घटक पक्षाच्या नेत्यांचे,पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत.