लोकमंगल फाउंडेशनतर्फे 10 मे रोजी धाराशिव येथे सामुदायिक विवाह सोहळा20 वर्षांची परंपरा; 3203 जोडपी विवाहबद्ध

लोकमंगल फाउंडेशनतर्फे   10 मे रोजी धाराशिव येथे सामुदायिक विवाह सोहळा
20 वर्षांची परंपरा; 3203 जोडपी विवाहबद्ध
राहुल कोरे आळणीकर

धाराशिव : लोकमंगल फाउंडेशनच्या वतीने 47 वा सामुदायिक विवाह सोहळा 10 मे 2026 रोजी धाराशिव येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी वधू-वरांची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून इच्छुकांनी लवकरात लवकर नोंदणी करण्याचे आवाहन लोकमंगल फाउंडेशनचे अध्यक्ष रोहन देशमुख यांनी केले आहे.
लोकमंगल फाउंडेशनचे संस्थापक तथा आमदार सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सामुदायिक विवाह सोहळ्याची परंपरा 2006 मध्ये सुरू झाली असून समाजात एक आदर्श उपक्रम म्हणून ओळख निर्माण झाली आहे. या उपक्रमाला यंदा 21 वे वर्ष पूर्ण होत आहे. गेल्या 20 वर्षांत एकूण 46 सामुदायिक विवाह सोहळे यशस्वीपणे पार पडले आहेत.
या सर्व सोहळ्यांमधून 3203 जोडपी विवाहबंधनात अडकली आहेत. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना या उपक्रमाचा मोठा आधार मिळाला आहे. सामुदायिक विवाहामुळे अनावश्यक खर्चाला आळा बसत असून साधेपणाने विवाह करण्याची प्रेरणा मिळत आहे.
विविध समाजघटकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. धर्मनिरपेक्षतेचा आदर्श जपत विविध धर्मांच्या जोडप्यांनी या सोहळ्यात सहभागी होत विवाह केला आहे.गेल्या 20 वर्षांत हिंदू धर्मातील 2490 जोडपी विवाहबद्ध झाली आहेत. तसेच बौद्ध समाजातील 681 जोडपी या सोहळ्यातून संसाराला सुरुवात केली आहे. मुस्लिम समाजातील 21 जोडपी या उपक्रमात सहभागी झाली आहेत. तर ख्रिश्चन धर्मातील 4 जोडपी विवाहबद्ध झाली आहेत. तसेच जैन समाजातील 7 जोडपी या सोहळ्यात सहभागी झाली आहेत.विवाह सोहळा  नोंदणी सुरु झाली अंतिम नोंदणी मुदत 30 एप्रिल 2026 आहे.
जास्तीत जास्त इच्छुकांनी या विवाह सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन लोकमंगल फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.
    नाव नोंदणीसाठी संपर्क :- मा.श्री.रोहन (दादा) देशमुख यांची संपर्क कार्यालय,जुन्या बस स्टँड समोर, आयसीआयसीआय बँकेच्य खाली,हंगरगेकर कॉम्प्लेक्स,तुळजापूर.
  विनोद देवकर :- संपर्क क्रमांक.  9923800256.
      लोकमंगल मल्टीस्टेट पोलिस लाईन समोर,तीर्थकर कॉम्पलेक्स, आनंद नगर, धाराशिव.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक