बेंबळी येथे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार फेरी जनतेचा उदंड, उत्स्फूर्त आणि उत्साहवर्धक प्रतिसाद!
बेंबळी येथे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार फेरी
जनतेचा उदंड, उत्स्फूर्त आणि उत्साहवर्धक प्रतिसाद!
धाराशिव -जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेंबळी येथे महायुतीचे जि.प. गटाचे अधिकृत उमेदवार श्री. महेंद्र भानुदास धुरगुडे, बेंबळी पंचायत समितीच्या उमेदवार सौ. प्रतिभाताई बालाजी गावडे तसेच रुईभर पंचायत समितीच्या उमेदवार सौ. सुचिताताई विनोद पाटील यांच्या प्रचारार्थ भव्य, शिस्तबद्ध व उत्साहाने भरलेली प्रचार फेरी मोठ्या जल्लोषात पार पडली.
या प्रचार फेरीत प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, युवक शक्ती आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने सहभागी होत महायुतीला आपला ठाम व दमदार पाठिंबा दर्शविला. सर्वत्र उसळलेला उत्साह, घोषणांचा गजर आणि नागरिकांचा विश्वास पाहता महायुतीच्या विजयाची दिशा स्पष्ट दिसत आहे.
बेंबळीच्या सर्वांगीण विकासासाठी, सुशासनासाठी आणि प्रत्येक नागरिकाच्या प्रगतीसाठी महायुतीचे उमेदवार निश्चितपणे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा जनतेचा विश्वास आहे.
धाराशिव जिल्ह्याच्या विकासासाठी आमदार श्री. राणाजगजितसिंह पाटील यांच्या सक्षम नेतृत्वाखाली संपूर्ण जनता महायुतीच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे आणि हाच विजयाचा खात्रीशीर मार्ग आहे!
धाराशिवच्या विकासासाठी, प्रगतीसाठी आणि स्थिर नेतृत्वासाठी
महायुतीच्या उमेदवारांच्या चिन्हावर बटण दाबा!
#प्रचारफेरी #बेंबळी #धाराशिव #महायुती #BJP #भाजप #VikasacheRajkaran #MajbootBJP #ZPPSNivadnuk
https://www.facebook.com/share/1BkRuwfy8K/