आळणी येथे २२ फेब्रुवारीपासून ‘श्री शिवमहापुराण कथे’चे आयोजनआचार्य प.पू. शिरिष महाराज बारी यांच्या सुमधुर वाणीतून रंगणार आध्यात्मिक पर्व

आळणी येथे २२ फेब्रुवारीपासून ‘श्री शिवमहापुराण कथे’चे आयोजन
आचार्य प.पू. शिरिष महाराज बारी यांच्या सुमधुर वाणीतून रंगणार आध्यात्मिक पर्व
राहुल कोरे आळणीकर 
धाराशिव : तालुक्यातील आळणी येथे समस्त ग्रामस्थांच्या वतीने ‘श्री शिवमहापुराण कथे’चे भव्य आयोजन करण्यात आले असून, रविवार दि. २२ फेब्रुवारी २०२६ पासून या धार्मिक सोहळ्याला प्रारंभ होणार आहे. आध्यात्मिक क्षेत्रातील नामवंत प्रवक्ते आचार्य प.पू. शिरिष महाराज बारी (हरिद्वार) यांच्या सुमधुर वाणीतून भाविकांना शिवमहापुराण कथा श्रवणाचा लाभ मिळणार आहे.

ही कथा रविवार दि. २२ फेब्रुवारी (फाल्गुन शुद्ध ५, शके १९४७) रोजी सुरू होऊन रविवार दि. १ मार्च २०२६ (फाल्गुन शुद्ध १२, शके १९४७) रोजी सांगता होणार आहे. दररोज सायंकाळी ७.०० ते रात्री १०.०० या वेळेत ग्रामदैवत श्री शंभू महादेव मंदिर, माळी गल्ली, आळणी (ता. जि. धाराशिव) येथे कथा आयोजित करण्यात आली आहे.

कथेच्या सांगतेनिमित्त रविवार दि. १ मार्च रोजी दुपारी १२ वाजेनंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक सोहळ्यामुळे परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले असून, ग्रामस्थांकडून कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे.

या मंगलमय सोहळ्याचा लाभ भाविकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन समस्त ग्रामस्थ, आळणी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक