उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अफरोज सिद्दिकी यांची कार्यालयीन अधीक्षकपदी बढती

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अफरोज सिद्दिकी यांची कार्यालयीन अधीक्षकपदी बढती
राहुल कोरे आळणीकर 
धाराशिव दि.१३ (प्रतिनिधी) - अंबाजोगाई येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात कार्यरत असलेले अधिकारी अफरोज सिद्दिकी यांची कार्यालयीन अधीक्षक या पदावर बढती (प्रमोशन) झाली आहे. त्यांना दीर्घ अनुभव असल्यामुळे कार्यालयीन कामकाजामध्ये करण्यासाठी अनुभवाची शिदोरी अतिशय उपयोगी पडणार आहे. दरम्यान, त्यांनी धाराशिव येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये कामकाज केले आहे.

 सिद्दिकी यांनी आपल्या सेवा कार्यकाळात कर्तव्यनिष्ठ, शिस्तबद्ध व प्रामाणिकतेला प्राधान्य दिलेले आहे. त्यांच्या कर्तव्यनिष्ठ कारभाराच्या आधारावरच त्यांनी विविध प्रकारच्या जबाबदारी यशस्वीपणे पार पाडलेल्या आहेत‌‌. विशेष म्हणजे कार्यालयीन कामकाजातील अचूकता, नियोजनबद्धता आणि सहकाऱ्यांशी सलोख्याचे संबंध ठेवून समन्वय व आपुलकीने संवाद साधलेला आहे. त्यांच्या या वाखानन्याजोग्या कामकाजाच्या प्रभावामुळे त्यांना बढती देण्यात आली असल्याची चर्चा सुरु आहे. त्यांच्या बढतीनिमीत्त कार्यालयात अधिकारी व कर्मचारी यांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
 यावेळी उपप्रादेशिक परिवहन विभागाचे निरीक्षक (प्रभारी डेप्युटी आर टी ओ) मोहम्मद गौस शेख यांच्या सह नितीन क्षीरसागर. अशोक. बोलचटवार. दिलीप सुरवसे. बळवंत राजे  अधिकारी व कर्मचारी यांच्यासह इतरांनी त्यांचा पुष्पगुच्छ,  शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. या बढतीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक