अणदूर परिसरात काँग्रेसला धक्का !
अणदूर परिसरात काँग्रेसला धक्का !
अणदूर ता. तुळजापूर येथील काँग्रेस पक्षाच्या माजी ग्रामपंचायत सदस्य विशाल शेटे, युवा नेते आण्णासाहेब आलूरे, रवी (गोटू) मुळे तसेच चिवरी गावाचे माजी सरपंच श्री. सचिन बिराजदार यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. भाजपच्या विकासाभिमुख धोरणांवर विश्वास ठेवून व पक्षाच्या संघटनात्मक कार्यपद्धतीने प्रेरित होऊन त्यांनी हा निर्णय घेतला.
यांच्यासोबत सर्व BTM ग्रुपाचे सदस्य संदिप धुमाळ,अभिलाष करपे, स्वप्निल भुरे,शिवाजी परीट,गणेश करपे,सुशांत भुरे, सुशिल करपे,परमेश्वर कुंभार,प्रशांत भुरे,रविराज यावलकर, शिवानंद करपे, आनंद यावलकर, दत्ता गायकवाड, दिपक संगशेट्टी,आकाश कसबे,विशाल कांबळे, नबीलाल शेख, विशाल खराडे,बसवेश्वर भंडारकवठे, विशाल ठाकूर,अभिजित सुर्यवंशी,गुंडूशा मदुळकर,ऋषिकेश धोत्रे, अमोल घुगे यांनीही भाजपात प्रवेश केला.
या सर्व नवप्रवेशी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे भारतीय जनता पार्टीत मनःपूर्वक स्वागत करून शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांच्या प्रवेशामुळे अणदूर व परिसरात भाजपची संघटनात्मक ताकद अधिक बळकट होणार असून गावाच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
याप्रसंगी श्री.धनराज मुळे, श्री.साहेबराव घुगे, श्री.रोहित भैय्या पडवळ, श्री. महादेव सालगे, श्री. विक्रांत दुधाळकर,प्रविण मुळे,इमाम शेख यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.