उपळा गटातील महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. प्रदीपभैय्या तानाजी शिंदे आणि वाघोली पंचायत समिती गणाचे उमेदवार श्री. प्रशांत श्रीमंत रणदिवे यांच्या प्रचारार्थ सारोळा (बु.) येथे भव्य प्रचार फेरी व कॉर्नर सभा उत्साहात

उपळा गटातील महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. प्रदीपभैय्या तानाजी शिंदे आणि वाघोली पंचायत समिती गणाचे उमेदवार श्री. प्रशांत श्रीमंत रणदिवे यांच्या प्रचारार्थ सारोळा (बु.) येथे भव्य प्रचार फेरी व कॉर्नर सभा उत्साहात
राहुल कोरे आळणीकर 
धाराशिव प्रतिनिधी

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपळा गटातील महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. प्रदीपभैय्या तानाजी शिंदे आणि वाघोली पंचायत समिती गणाचे उमेदवार श्री. प्रशांत श्रीमंत रणदिवे यांच्या प्रचारार्थ सारोळा (बु.) येथे भव्य प्रचार फेरी व कॉर्नर सभा उत्साहात आणि जल्लोषात पार पडली. 
या प्रचाराच्या माध्यमातून विकास, विश्वास आणि एकजुटीचा संदेश घरोघरी पोहोचविण्यात आला. उपळा, वाघोली, सारोळा, काजळा परिसराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीत सक्षम, कर्तृत्ववान आणि विश्वासार्ह नेतृत्वाला संधी देण्याचे भावनिक व ठाम आवाहन केले.
जनतेकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद, डोळ्यात दिसणारी आशा आणि भरभरून लाभलेले प्रेम हेच परिवर्तनाचे स्पष्ट संकेत आहेत. यावेळी उपळा गटातील मतदारांनी विकासाच्या वाटेवर ठामपणे उभे राहत, महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे साथ देण्याचा निर्धार केला आहे.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक