बावनकुळे यांनी घेतले तुळजाभवानीचे दर्शन

बावनकुळे यांनी घेतले तुळजाभवानीचे दर्शन
धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आलेले राज्याचे कर्तबगार महसूल मंत्री मा. ना. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या समवेत आई तुळजाभवानी मातेचे मनोभावे दर्शन घेतले.

यावेळी मंदिर परिसरात सुरू असलेल्या विकासकामांची मंत्री महोदयांनी प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. महायुती सरकारच्या माध्यमातून तीर्थक्षेत्र तुळजापूरच्या सर्वांगीण विकासासाठी व्यापक विकास आराखडा मंजूर करण्यात आला असून, या आराखड्यानुसार लवकरच मोठ्या प्रमाणावर विकासकामांना गती मिळणार आहे.


Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक