जिल्हा परिषदेवर महायुतीचा ठसा; अर्चनाताई पाटील अध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर!

जिल्हा परिषदेवर महायुतीचा ठसा; अर्चनाताई पाटील अध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर!
राहुल कोरे आळणीकर 

धाराशिव प्रतिनिधी

जिल्हा परिषदेतील सत्तासमीकरण आता महायुतीच्या बाजूने झुकले असून मॅजिक फिगरसाठी आवश्यक असलेल्या संख्येपेक्षा अधिक सदस्यांचा पाठिंबा महायुतीकडे असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोकण सहलीवर असलेल्या भाजप आणि महायुतीच्या ३१ सदस्यांची आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि भाजपचे युवा नेते मल्हार पाटील यांनी भेट घेत संवाद साधला. या बैठकीनंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
महाविकास आघाडीच्या मदतीने शिंदे सेनेतील एका गटाने सत्ता स्थापनेचा दावा केला होता; मात्र सद्यस्थितीत त्या दाव्याची हवा निघाल्याची चर्चा सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आणखी काही सदस्य आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या संपर्कात असून महायुतीची संख्या अधिक बळकट होत आहे.
अध्यक्षपदासाठी अर्चनाताई पाटील यांना ३५ पेक्षा अधिक सदस्यांचे पाठबळ असल्याचे सांगितले जात आहे. एकूण ५५ सदस्यांपैकी ३८ सदस्य अर्चनाताई पाटील यांच्या अध्यक्षपदाच्या बाजूने ठाम असल्याचा दावा महायुतीकडून करण्यात येत आहे.
ऐनवेळी भूमिका जाहीर करणाऱ्या तीन सदस्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले असले तरी सध्याच्या घडीला जिल्हा परिषदेवर महायुतीचे वर्चस्व कायम राहण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक