नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना वाहन खरेदीसाठी ४० लाखांची तरतूद!राजमाता जिजाऊ छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी तरतूदच नाही!५ लाख ८१ हजार शिलकीचा अर्थसंकल्प सादर : आठवडी बाजारातून कर वसुलीसाठी ठेकेदार नेमणार

नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना वाहन खरेदीसाठी ४० लाखांची तरतूद!
राजमाता जिजाऊ छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी तरतूदच नाही!

५ लाख ८१ हजार शिलकीचा अर्थसंकल्प सादर : आठवडी बाजारातून कर वसुलीसाठी ठेकेदार नेमणार

राहुल कोरे आळणीकर 

धाराशिव प्रतिनिधी

 धाराशिव नगर परिषदेचा  २०२६-२७ चा अर्थसंकल्पाचे वाचन लेखा अधिकारी तनवीर जमादार यांनी केले. या अर्थसंकल्पात नगराध्यक्ष नेहा काकडे व मुख्याधिकारी यांना फिरण्यास वाहने खरेदी करण्यासाठी ४० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर आठवडी बाजारात भाजीपाला विक्री करण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्याकडून अव्वाच्या सव्वा जागेचे भाडे वसूल करण्यासाठी ठेकेदार नेमण्याचा ठराव पारित केला. 
या आर्थिक वर्षाचा ५ लाख ८१ हजार ५१३ रुपये शिल्लकीचा अर्थसंकल्प सादर केला असला तरी राजमाता जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी एक रुपयाच्या निधीची तरतूदच केली नाही हे या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. 

धाराशिव नगर परिषदेच्या सभागृहात दि.२७ फेब्रुवारी रोजी नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्यासह सर्व विषय समिती सभापती आणि सर्व नगरसेवकाच्या उपस्थितीत २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प ३१४ कोटी २१ लाख ५४ हजार ८७५ रुपयांचा आहे. यामध्ये महसुली जमा ५८ कोटी ८४ लाख रुपये ग्राह्य धरला असून खर्च ५८ कोटी ८० लाख रुपयांची अपेक्षा केली आहे. तसेच भांडवली जमा रक्कम २५४ कोटी ६३ लाख रुपये अपेक्षित असून खर्च २५४ कोटी ३४ लाख रुपयांचा ग्राह्य धरला आहे. प्रारंभी शिल्लक रक्कम ७४ लाख ६ हजार रुपये तर महसुली व भांडवली अशी एकूण जमा रक्कम ३१३ कोटी ४७ लाख ४८ हजार ७७३ होणार आहे. मात्र, जमा रकमेपैकी ३१४ कोटी १५ लाख ६३ हजार ३६२ रुपये खर्च ग्राह्य धरण्यात आले आहे. 

......

घनकचरा व्यवस्थापनासाठी वर्षाला आठ कोटी रुपयांचा खर्च येतो. मात्र या अर्थसंकल्पात फक्त दोन कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करून पुन्हा शहर कचरामुळे व दुर्गंधीयुक्त करणार का असा प्रश्न या तरतुदीमुळे निर्माण झाला आहे. तसेच नदी संवर्धन योजनेसाठी एक रुपयाची देखील तरतूद केलेली नाही.  तर रस्ता फंडसाठी देखील कुठलीही तरतूद नाही. याबरोबरच जिल्ह्याचे मुख्यालय असताना देखील शहरात विशेषतः वरदळीच्या ठिकाणी महिलांच्या सोईसाठी अत्यावश्यक असलेल्या शौचालयासाठी देखील एक रुपयाची तरतूद केली नाही.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक