कानेगावच्या विकासाला मिळणार 'बुस्टर डोस'; नवनियुक्त जि.प. सदस्या सुवर्णा पाटील यांनी घेतली पालकमंत्र्यांची भेटपालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्याकडून सुवर्णा पाटील यांचा गौरव; प्रलंबित कामे मार्गी लावण्याचे अधिकाऱ्यांना आदेश
कानेगावच्या विकासाला मिळणार 'बुस्टर डोस'; नवनियुक्त जि.प. सदस्या सुवर्णा पाटील यांनी घेतली पालकमंत्र्यांची भेट
पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्याकडून सुवर्णा पाटील यांचा गौरव; प्रलंबित कामे मार्गी लावण्याचे अधिकाऱ्यांना आदेश
लोहारा (प्रतिनिधी):विक्रांत संगशेट्टी)- लोहारा तालुक्यातील कानेगाव जिल्हा परिषद गटात मिळालेल्या दैदिप्यमान विजयाचे पडसाद आता थेट राजधानी मुंबईत उमटले आहेत. या विजयानंतर नवनियुक्त जिल्हा परिषद सदस्या सौ. सुवर्णा सतीशराव पाटील यांनी धाराशिवचे पालकमंत्री ना. प्रतापजी सरनाईक यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी मंत्रीमहोदयांनी सौ. सुवर्णा सतीश पाटील यांचा यथोचित सत्कार करत त्यांना भावी जनसेवेसाठी शुभेच्छा दिल्या.
व जनतेच्या विश्वासाला विकासाने उत्तर देणार
कानेगाव गटातील हा विजय म्हणजे जनतेने विकासाच्या राजकारणावर दाखवलेला अढळ विश्वास आहे, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. केवळ सदिच्छा भेट न थांबवता, पालकमंत्र्यांनी या विजयाची दखल घेत मतदारसंघातील प्रश्नांवर तातडीने चर्चा केली.
प्रलंबित कामांचा आढावा आणि निधीची ग्वाही दिली.
लोकसभा अध्यक्ष युवासेना धाराशिव आनंद भैय्या पाटील यांनी कानेगाव गटातील प्रलंबित विकासकामांची सविस्तर माहिती पालकमंत्र्यांसमोर मांडली. पालकमंत्र्यांनी तातडीने संबंधित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून संपर्क साधून ही कामे प्राधान्याने मार्गी लावण्याचे आदेश दिले. "कानेगावच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही," अशी ग्वाही ना. सरनाईक यांनी यावेळी दिली.
लोकसभा अध्यक्ष युवासेना धाराशिव आनंद भैय्या पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात व विशेषता लोहारा तालुक्यात युवा सेनेचे मोठे संघटन उभे केले आहे. पालकमंत्र्यांशी असलेल्या त्यांच्या निकटच्या संबंधांमुळे कानेगाव गटातील विस्तारित आणि प्रलंबित कामे आता वेगाने पूर्ण होतील, असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे. या भेटीमुळे कानेगाव गटात आनंदाचे वातावरण असून विकासाला नवी गती मिळण्याचे संकेत मिळाले आहेत.