युवकांसाठी ज्ञानाचा दीप प्रज्वलित , छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सोनेगाव येथे स्वामी विवेकानंद अभ्यासिकेचे लोकार्पण

युवकांसाठी ज्ञानाचा दीप प्रज्वलित , छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सोनेगाव येथे स्वामी विवेकानंद अभ्यासिकेचे लोकार्पण
राहुल कोरे आळणीकर 
धाराशिव (प्रतिनिधी) – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून धाराशिव तालुक्यातील सोनेगाव येथे स्वामी विवेकानंद अभ्यासिका चे लोकार्पण आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते ग्रामस्थ व युवकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले.
विधानसभा निवडणुकीदरम्यान युवकांना सक्षम व स्पर्धात्मक बनवण्यासाठी प्रत्येक गावात अभ्यासिका उभारण्याचे दिलेले वचन प्रत्यक्षात उतरवण्याचा हा पहिला ठोस टप्पा असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. युवकांना स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षण आणि वैचारिक घडण यासाठी सक्षम व्यासपीठ मिळावे या उद्देशाने ही अभ्यासिका उभारण्यात आली आहे.

ग्रामीण भागातील अनेक होतकरू विद्यार्थी योग्य अभ्यासाची जागा, संदर्भग्रंथ आणि शांत वातावरणाच्या अभावामुळे मागे पडतात, ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन हा उपक्रम राबवण्यात आला आहे. या अभ्यासिकेमध्ये आधुनिक संदर्भग्रंथ, स्पर्धा परीक्षांची पुस्तके, दैनिके, मासिके तसेच डिजिटल साधनसामग्रीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना दर्जेदार व शांत अभ्यासाचे वातावरण गावातच उपलब्ध झाले असून मोठ्या शहरात जाण्याची गरज कमी होणार आहे.

ही केवळ एका अभ्यासिकेची उभारणी नसून युवकांच्या स्वप्नांना बळ देणारी आणि त्यांच्या यशाचा पाया मजबूत करणारी क्रांतिकारी सुरुवात असल्याचे मत व्यक्त करत आमदार पाटील म्हणाले, “युवक सक्षम झाला तर समाज सक्षम होतो आणि समाज सक्षम झाला तर राष्ट्र मजबूत होते.” युवकांच्या बौद्धिक सक्षमीकरणासाठी सुरू केलेला हा उपक्रम भविष्यात मोठ्या परिवर्तनाची नांदी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमाला प्रवीण लाला पवार, नगरसेवक नाना घाडगे, उमेश सातपुते, आदित्य पवार, लक्ष्मण मुंडे, दयानंद थोरात, निलेश शिंदे, क्षीरसागर सर, अक्षय नाईकवाडी, अमोल जाधव, आबा वायकर यांच्यासह विद्यार्थी, युवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक