“तेरच्या माऊली जिल्ह्याच्या सत्तेच्या शिखरावर..?धाराशिवमध्ये अर्चनाताईंच्या नावाची जोरदार चर्चा..!”

“तेरच्या माऊली जिल्ह्याच्या सत्तेच्या शिखरावर..?

धाराशिवमध्ये अर्चनाताईंच्या नावाची जोरदार चर्चा..!”
राहुल कोरे आळणीकर 
धाराशिव -जिल्ह्याच्या राजकारणात सध्या एकच नाव गाजत आहे ; अर्चनाताई पाटील. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या चर्चांनी वेग घेतला असून, तेरच्या या “माऊली”कडे सर्वांचे लक्ष खिळले आहे. हा केवळ राजकीय समीकरणांचा भाग नाही, तर ग्रामीण जनतेच्या अपेक्षांचा केंद्रबिंदू ठरलेला क्षण आहे.

📌 अनुभव, कार्यशैली आणि विश्वासाची ताकद

दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून येणे आणि उपाध्यक्षपदाची धुरा समर्थपणे सांभाळणे, ही केवळ पदांची माळ नाही, तर जनतेने दिलेल्या विश्वासाची पावती आहे. जिल्हा परिषदेसारख्या व्यापक संस्थेत काम करताना प्रशासनाशी संघर्षही करावा लागतो आणि समन्वयही साधावा लागतो. अर्चनाताईंनी दोन्ही गोष्टी संतुलितपणे केल्या, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

📌 “गोरगरिबांची माऊली”.;. नाव की कार्य..?

राजकारणात अनेकांना बिरुदं मिळतात; पण ती टिकवण्यासाठी सातत्याने काम करावे लागते. तेर आणि परिसरातील सामान्य कुटुंबांच्या अडचणींमध्ये पुढे येणारी, शासकीय योजना अडकली तर अधिकाऱ्यांच्या दारात ठाम उभी राहणारी, रुग्णाला उपचारासाठी मदत करणारी ; अशी प्रतिमा अर्चनाताईंची तयार झाली आहे. म्हणूनच त्यांना “माऊली” म्हणणाऱ्या जनतेच्या भावना केवळ राजकीय घोषणांपुरत्या मर्यादित नाहीत अशी चर्चा नागरिकत सुरू आहे.

📌 जिल्हा परिषदेला हवे असलेले नेतृत्व..?

आज जिल्हा परिषदेसमोर शिक्षणाची गुणवत्ता, ग्रामीण रस्ते, पाणीपुरवठा, महिला बचतगटांचे सबलीकरण, आरोग्य सुविधा या मोठ्या आव्हानांचा डोंगर उभा आहे. अध्यक्षपद केवळ प्रतिष्ठेचे नसून जबाबदारीचे आहे. अशा वेळी अनुभवी, प्रशासनात पारंगत आणि लोकांशी थेट संवाद साधणारे नेतृत्व जिल्ह्याला हवे आहे, अशी चर्चा सुरू आहे.

📌 राजकीय गणितांपलीकडे जनतेचा आवाज 

धाराशिवमध्ये सध्या गट-तट, समीकरणे, बैठका आणि चर्चा यांचा धुरळा उडत आहे. पण या सर्वांपलीकडे सामान्य माणसाचा एकच प्रश्न आहे  “आपल्या कामाला गती देणारे नेतृत्व कोण?”

अर्चनाताईंच्या नावाभोवती निर्माण झालेली सकारात्मक लाट ही केवळ राजकीय रणनीतीचा भाग नसून, अनेक वर्षांच्या कामातून तयार झालेल्या विश्वासाची देण आहे.

📌 निर्णायक क्षण समीप

अध्यक्षपदाची अधिकृत घोषणा अद्याप बाकी असली तरी जिल्ह्यातील वातावरण सूचक आहे. जर तेरची “माऊली” जिल्हा परिषद अध्यक्षपदी विराजमान झाली, तर तो केवळ व्यक्तीचा विजय नसेल; तो ग्रामीण भागातील सर्वसामान्यांच्या अपेक्षांचा विजय ठरेल, असा सूर अनेकांकडून ऐकू येत आहे.

#RanajagjitsinhaPatil #धाराशिव #MalharPatil #archanaranajagjitsinhpatil #DevendraFadnavis #dharashiv #osmanabad #dattakulkarni

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक