अन्याय सहन करील तो शिवसैनिक कसला?” — शिवसैनिकांवरील अन्यायाविरोधात अजित खोत यांचा निर्णायक आवाज ....
अन्याय सहन करील तो शिवसैनिक कसला?” — शिवसैनिकांवरील अन्यायाविरोधात अजित खोत यांचा निर्णायक आवाज ....
धाराशिव | प्रतिनिधी. राहुल कोरे आळणीकर
“अन्याय सहन करी तो शिवसैनिक कसला?” या ठाम आणि धारदार घोषवाक्यासह शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक ॲड. अजित खोत यांनी शिवसैनिकांवरील अन्यायाविरोधात थेट लढा उघडण्याचा निर्धार केला आहे.
उद्या सकाळी 11:30 वाजता, शासकीय विश्रामगृह, एसपी ऑफिस समोरील कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते आपली ठाम भूमिका मांडणार आहेत.
या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे तक्रार सादर करण्यात येणार असून, जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना संपवण्याचा डाव रचला जात असल्याचा गंभीर आरोप केला जाणार आहे.
⚠️ पत्रकार परिषदेत मांडले जाणारे प्रमुख मुद्दे :
भाजपाच्या व्यक्तीला शिवसेनेच्या ‘बाण’ चिन्हावर निवडणूक लढविण्याची संधी देऊन शिवसेना कमजोर करण्याचा कट
या प्रक्रियेत खऱ्या शिवसैनिकांवर झालेला अन्याय
जिल्हा नियोजन समितीच्या निधी वितरणातून शिवसैनिकांना वगळण्यात आल्याचा आरोप
पक्षांतर्गत व प्रशासकीय पातळीवरील अन्यायाविरोधात थेट आवाज
ॲड. अजित खोत यांनी स्पष्ट केले की, “मी शिवसैनिक म्हणून गप्प बसणार नाही. अन्यायाविरोधात उघडपणे लढणार आहे.”
त्यांच्या या ठाम भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, या पत्रकार परिषदेवर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.