पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या सौजन्याने शिवजयंती महोत्सवानिमित्त आकर्षक सजावट व एआय-आधारित विद्युत रोषणाई

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या सौजन्याने शिवजयंती महोत्सवानिमित्त आकर्षक सजावट व एआय-आधारित विद्युत रोषणाई
राहुल कोरे आळणीकर 

धाराशिव : मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने यंदाच्या शिवजयंतीनिमित्त शहरात भव्य व दिमाखदार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या सौजन्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याभोवती आकर्षक सजावट व अत्याधुनिक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यावर्षीची ‘शिवशंभो’ ही संकल्पनाधारित थीम नागरिकांच्या विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे.
दि. १० फेब्रुवारी रोजी एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाचा वापर करून साकारण्यात आलेल्या भव्य लाईटिंग शोचे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले. शिवरायांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. विद्युत रोषणाईची बहुरंगी उधळण, आकर्षक प्रकाशचित्रे आणि फटाक्यांच्या आतषबाजीमुळे संपूर्ण आसमंत शिवमय झाला होता. या सोहळ्याने उपस्थित नागरिकांना थक्क करून टाकले.
यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. विविध कलावंतांनी सादर केलेल्या देशभक्तिपर व शिवचरित्रावर आधारित सादरीकरणांनी वातावरण भारावून गेले. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला.
या प्रसंगी समितीचे अध्यक्ष आकाश मिलींदराव कोकाटे यांच्यासह मार्गदर्शक प्रकाश जगताप, विश्वास शिंदे, प्रदिप साळुंके, नानासाहेब निंबाळकर, भारत कोकाटे, दत्ता बंडगर, बाळासाहेब शिंदे, पंडित मुंडे,रमेश कोकाटे, सचिन शिंदे, उमेश राजेनिंबाळकर, चंद्रसेन देशमुख, नाना घाटगे, सय्यद खलील, अंबादास दानवे, निलेश भोसले, ॲड. गजानन चौगुले, दत्ता लोकरे, युवराज कुऱ्हाडे, अझहर शेख तसेच समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिस्तबद्ध नियोजन, आकर्षक सजावट आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम साधत यंदाचा शिवजयंती महोत्सव शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारा ठरला आहे.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक