*विचार करून मतदान करा-सचिन लोमटे*
*विचार करून मतदान करा-सचिन लोमटे*
राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत 125 पंचायत समिती निवडणूक 2026 चे मतदान निवडणुकीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. मतदान करणे प्रत्येक मतदारांचे कर्तव्य व मतदारांचा अधिकार आहे. आणि तो आपण सर्वांनी एकनिष्ठेने बजावला पाहिजे.
07 फेब्रुवारी 2026 रोजी धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी मतदान होत आहे. यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे, मतदानाचा टक्का वाढला पाहिजे, यासाठी आपण सर्वांनी पाऊल उचलणे गरजेचे आहे. प्रशासन त्यांचे कर्तव्य बजावत आहे आपणही आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे मतदारांना पोल चिट्ठी मिळाली असेल काहींना मिळाली नसेल तर गेल्या निवडणुकीत ज्या ठिकाणी आपण मतदान केले आहे तिथे आपले मतदान कार्ड अथवा शासनाने ठरविल्याप्रमाणे आधार कार्डसह इतर बारा पुराव्यातील एक पुरावा दाखवुन मतदान करा तसेच माझ्याकडे हेच नाही म्हणून मागे राहुन मतदानापासुन वंचित राहु नका असे आवाहन भारतीय जनता पार्टी तालुका चिटणीस सचिन लोमटे यांनी केले आहे.
पुढे लोमटे यांनी म्हटले आहे की, मतदाना पासून कोणीही वंचित राहू नये मतदाना दिवशी शासकीय सुट्टी असल्याने सर्वांनी मतदान करूनच पुढील कामाचे नियोजन करावे. आपलं एक मतदान अमूल्य आहे. आपलं मत देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे. एका मताची किंमत आपणाला कळत नसेल परंतु सरकार स्थापन करण्यासाठी त्याची किंमत कळते. आपलं एक मतदान देशाचे भविष्य ठरवते यासाठी आपले मत अनमोल आहे ते मतदान योग्य उमेदवाराला करून त्याचा योग्य वापर करा व इतरांना कल्पना द्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका आमिषाला बळी पडू नका असे आवाहनही लोमटे यांनी केले आहे.