उपळा गटात भाजपात जाहीर पक्षप्रवेश; महायुतीची ताकद वाढली

उपळा गटात भाजपात जाहीर पक्षप्रवेश; महायुतीची ताकद वाढली 
धाराशिव : 
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पवार (उपळा), तालुका सचिव आश्रुबा गाढवे (वरुडा), युवक जिल्हा सचिव प्रविण पाडुलकर, तालुका सचिव विजय मुंडे तसेच पवारवाडी येथील कार्यकर्त्यांनी उपळा गटातील महायुतीच्या उमेदवारांना जाहीर समर्थन देत मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.

या पक्षप्रवेशामुळे उपळा गटात महायुतीची संघटनात्मक ताकद अधिक बळकट झाल्याचे मत मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक