़*AI परिषदेत काँग्रेसचे आंदोलन, भाजप रस्त्यावर:धाराशिव येथे निषेध मोर्चा घोषणाबाजी*
*AI परिषदेत काँग्रेसचे आंदोलन, भाजप रस्त्यावर:धाराशिव येथे निषेध मोर्चा घोषणाबाजी*
धाराशिव :- नवी दिल्ली येथे 16 ते 20 फेब्रुवारी या काळात एआय एम्पॅक्ट पार पडले मात्र कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय ) या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांनी भारत आणि अमेरिका यांच्यात झालेल्या व्यापार कराराचा विरोध करण्यासाठी टी-शर्ट काढून अर्ध नग्न आंदोलन केले. त्यांचे अनेक व्हिडिओ ही समोर आले आहेत. यात 15-20 कार्यकर्ते हातात पांढऱ्या रंगाचे टी-शर्ट घेऊन आहेत. टी-शर्टवर पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा फोटो आहे. त्यावर लिहिले आहे - PM इज कॉम्प्रमाईज्ड.त्यांनी केलेले हे कृत्य अशोबनीय आणि निंदनीय आहे. याच्या निषेधार्थ बुधवार दि. 25/02/2026 रोजी भारतीय जनता पार्टीच्या वतीने धाराशिव छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने केली. भाजपा कार्यकर्त्यांनी 'काँग्रेस-राहुल गांधी=गद्दार', 'देशद्रोही राहुल गांधी माफी मागा' असे फलक घेऊन निषेध केला.
याप्रसंगी महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रीती कदम,धाराशिव नगराध्यक्षा नेहा काकडे, नंदाताई पुनगडे, अंजलीताई बेताळे, अस्मिता कांबळे, सगुणा आचार्य,अल्का पारवे, वैशाली सोनवणे, विद्या माने, शिवानी परदेशी, विलास लोंढे,राहुल काकडे,रोहित देशमुख, नितीन बप्पा शेरखाने, सुशांत सोनवणे, सचिन लोमटे, प्रविण पाठक, अमोल निंबाळकर,सिद्देश भोसले,सुशेन मेकिंले,पांडुरंग गाजरे व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.