शेतकऱ्याने लावला धाराशिव मध्ये 485.69 किलो अफू , कारवाई ..वाशी तालुक्यातील दशमेगाव येथील प्रकार...धाराशिव पोलिसांची मोठी कार्यवाही....

  शेतकऱ्याने लावला धाराशिव मध्ये 485.69 किलो अफू , कारवाई ..वाशी तालुक्यातील दशमेगाव येथील प्रकार...धाराशिव पोलिसांची मोठी कार्यवाही....
राहुल कोरे आळणीकर 
धाराशिव: अफूची शेती उद्ध्वस्त 
दिनांक: १२/०२/२०२६
ठिकाण: मौजे दसमेगाव शिवार, वाशी (धाराशिव)
वाशी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव यांनी संयुक्त कारवाई करत NDPS ॲक्ट अंतर्गत मोठी कारवाई केली आहे.
कारवाईचे तपशील:
 * शेत: समाधान मनोहर उघडे यांच्या मालकीचे (गट नं. १६३).
 * प्रकार: कांद्याच्या पिकात लपवून केलेली अफूची लागवड.
 * जप्त मुद्देमाल: ४८५.६५ किलो अफूची झाडे/बोंडे.
 * एकूण किंमत: ₹७२,८४,७५०/- (७२ लाख ८४ हजार ७५० रुपये).
कायदेशीर कारवाई:
वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं. ४५/२०२६, कलम ८(c), १८ NDPS ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोकर मॅडम , मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना मॅडम , मा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनिल चोरमले , श्री विनोद ईज्जपवार पोलीस निरीक्षक स्था. गु. शा . पोलीस निरीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी कासार , सपोनी यशवंत घोडके , अंमलदार  शौकत पठान , जावेद काझी , कपील बोरकर , गणेश खैरे , श्रीनिवास घुले , विकास जगताप, ज्योती बहीरवाल यांचे संयुक्त पथकाने केली .

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक