*कोंड जिल्हा परिषद गटात भाजपाचा झेंडा; शितल खांडेकर यांचा 2082 मतांनी दणदणीत विजय*

*कोंड जिल्हा परिषद गटात भाजपाचा झेंडा; शितल खांडेकर यांचा 2082 मतांनी दणदणीत विजय*
धाराशिव : कोंड जिल्हा परिषद गटात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टी -महायुतीचे उमेदवार शितल आदित्य खांडेकर यांनी शिवसेना (उबाठा) गटाचे उमेदवार मंगल शेटे यांचा 2082 मतांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला. या निकालामुळे कोंड गटावर भाजपा महायुतीचे राजकीय वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून, खांडेकर यांनी आपले नेतृत्व सिद्ध केले आहे. गावागावांत राबवलेली विकासकामे, शेतरस्त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न, सामाजिक उपक्रमांतील सक्रिय सहभाग आणि सर्वसामान्य नागरिकांशी असलेला थेट व नियमित संपर्क - हेच त्यांच्या

विजयामागील प्रमुख घटक ठरले. "कामातून विश्वास" हीच खांडेकर यांची ओळख या निकालातून पुन्हा स्पष्ट झाली आहे. ग्रामीण जनतेने विकासकामांवर विश्वास व्यक्त करत शिक्कामोर्तब केल्याचीभावना यानिमित्ताने व्यक्त होत आहे. 

विजयानंतर तालुका चिटणीस सचिन लोमटे राहुल जाधव यांच्यासह महायुती समर्थकांनी गुलाल उधळत, फटाके फोडत तसेच ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष साजरा केला. विजयानंतर बोलताना शितल खांडेकर म्हणाल्या की हा विजय माझा वैयक्तिक नसून कोंड गटातील सर्वसामान्य जनतेचा आहे. जनतेने दिलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही कोंड गटाच्या सर्वांगीण विकासासाठी मी पूर्वीप्रमाणेच कटिबद्ध राहीन. असे मत व्यक्त केले.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक