ना गावात घर आहे, ना शिवारात शेत, 'लेकरा शिक' असं सांगायला ना आई आहे ना वडील अक्षरशः हाॅटेलात काम करून स्वत:च्या पायावर उभा राहिलेला अमोल आज मुंबई हायकोर्टात वर्ग-2 वरिष्ठ अनुवादक आणि दुभाषी या पदावर कार्यरत

ना गावात घर आहे, ना शिवारात शेत, 
'लेकरा शिक' असं सांगायला ना आई आहे ना वडील 
अक्षरशः हाॅटेलात काम करून स्वत:च्या पायावर उभा राहिलेला अमोल आज मुंबई हायकोर्टात वर्ग-2 वरिष्ठ अनुवादक आणि दुभाषी या पदावर कार्यरत आहे.
राहुल कोरे आळणीकर 
अमोल वाचन, संयम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि प्रचंड मेहनत करण्याची तयारी यामुळे तो आज या पदावर पोहचला आहे.
अशा संघर्षातून उभा राहिलेल्या अमोल चा सत्कार शिवजयंतीच्या निमित्ताने काल आळणी येथे सद् भावना परिवाराच्या कडून करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना अमोलने गावातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाला की, 'यश मिळावच असेल तर त्यासाठी कुठलाही short cut नाही. त्यासाठी झगडावेच लागते.'
तसेच तो पुढे बोलताना म्हणाला की, ' सद् भावना परिवाराच्या वतीने जे गावात ग्रंथालय आणि अभ्यासिका सुरू करण्यात येणार आहे, त्यासाठी हवी ती मदत करणार आहे.'
आपल्या जन्म गावात आपल्या गावच्या लोकांकडून शाबासकीची थाप मिळत आहे हा अभिमानाचा क्षण आहे म्हणून 
अतिशय व्यस्त कामकाज असून देखील अमोल गावी आला होता.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक