भाजपात महत्त्वाची नियुक्ती
भाजपात महत्त्वाची नियुक्ती!
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका 2025 च्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यासाठी भारतीय जनता पक्षाने मोठी घोषणा केली आहे.
धाराशिव जिल्हा निवडणूकप्रमुख म्हणून माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे,
तर जिल्हा निवडणूकप्रभारी म्हणून आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
ही घोषणा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अधिकृतपणे केली आहे.
या नियुक्त्यांमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी भाजप धाराशिव जिल्ह्यात अधिक जोमाने सज्ज होत असल्याचे संकेत मिळत आहेत.
राजकीय निरीक्षकांच्या मते, ठाकूर आणि पाटील या दोघांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटन मजबूत होणार असून निवडणुकीत नव्या रणनीतीसह भाजप मैदानात उतरणार आहे.
#RanajagjitsinhaPatil #sujitsinhthakur #bjpdharashiv #dharashiv #tuljapur #paranda