अँड. मंजुषा साखरेंचे नाव चर्चेत; उच्च शिक्षित उमेदवाराला पसंती ?धाराशिवमध्ये यंदा नवा चेहरा, नवे नेतृत्व

अँड. मंजुषा साखरेंचे नाव चर्चेत; उच्च शिक्षित उमेदवाराला पसंती ?
धाराशिवमध्ये यंदा नवा चेहरा, नवे नेतृत्व

▶ धाराशिव, (वा.) धाराशिव शहरात आगामी २०२६ च्या नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) कडून ओबीसी महिला प्रवर्गासाठी नगराध्यक्षपदाची निवडणूक रंगतदार होणार असल्याचे चित्र दिसत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगरसेवक अँड. विशाल प्रभाकर साखरे चाच्या पानी प्रा. आठ वाले साखरे या नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याची जोरदार चर्चा शहरात सुरु आहे. शिक्षण, कायदा आणि सामाजिक क्षेत्र या तिन्ही क्षेत्रांत आपला ठसा उमटवलेल्या अॅड. मंजुषा साखरे या उच्च शिक्षित आहेत. त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाड विद्यापीठाच्या

बायोटेक्नॉलॉजी विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या व सध्या धाराशिव महापातकाल कार्यरत करीत आहेत. महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून शहरातील महिलांना व्यावसायिक, शैक्षणिक सामाजिकस्तरावर पुढे आणण्यासाठी त्यांनी विविध ग्रुप स्थापन केले आहेत. कोविड काळात तब्बल ५ लाख रुपयांच्या किटचे वाटप केले होते.

घरामध्ये राजकीय वारसा; समाजसेवेचा आहे वसा

धाराशिव नगरपरिषदेच्या २०१०-११ व्या निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून आलेले अॅड, विशाल प्रभाकर साखरे हे देखील पाणीपुरवठा व बाधकाम सभापती या पदांवर कार्यरत राहिले आहेत. त्यांनी पक्ष संघटन बळकट करण्यासाठी जिलार, शहर व विधानसभा स्तरावर कार्यकर्त्यांसह सक्रिय सहभाग घेतला आहे. राष्ट्र‌वादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार, जिल्हाध्यक्ष महेंद्र बुरगुडे, जिल्ह्यातील विविध पदाधिकान्यांच्या मार्गदर्शनाखाली साखरे दाम्पत्यांनी सातत्याने पक्षवृद्धीसाठी काम केले आहे.

पक्षाकडून संधी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू

धाराशिव शहरातील सुशिक्षित, कायद्याचे ज्ञान असलेली आणि समाजमन जिंकणारी महिला महणून अॅड. मंजुषा विशाल साखरे या नगराध्यक्षपदासाठी सक्षम पर्याय ठरत असून त्यांच्या उमेदवारीबाबत पक्षांतर्गत चांगली चर्चा सुरू आहे. आपल्या नेतृत्वाखाली समाजहितासाठी आणखी प्रभावीपणे काम करण्याची संधी मिळावी, एवढीच आमची अपेक्षा आहे, असे मत अॅड. विशाल प्रभाकर साखरे यांनी व्यक्त केले.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक