*पूरग्रस्त कुटुंबांना मनिषा केंद्रे यांच्या वतीने किराणा साहित्य भेट*

*पूरग्रस्त कुटुंबांना मनिषा केंद्रे यांच्या वतीने किराणा साहित्य भेट*
धाराशिव :- धाराशिव जिल्ह्यात यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून कुटुंबाचा संसार उघड्यावर आलेला आहे. अभूतपूर्व अशा प्रकारचे नुकसान झालेले आहे. यातून सावरण्यासाठी विशेष मदतीची गरज आहे. या संकटात भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा चिटणीस सौ. मनिषाताई नवनाथ केंद्रे यांनी भंडारवाडी व परिसरातील पूरग्रस्त कुटुंबांना भेट देऊन नुकसानाची पाहणी केली. तसेच तात्पुरती मदत म्हणून किराणा साहित्याचे वाटप केले. किराणा साहित्याचे वाटप करत असताना अनेक महिलांना अश्रू अनावर झाले. 
      भंडारवाडी व परिसरातील गावांमध्ये अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने घरातील संस्कार उपयोगी वस्तू आणि अन्नधान्य पूर्णपणे खराब झालं यामुळे अनेक कुटुंबाचा संसार उघड्यावर आला आहे. त्यांच्यासमोर अन्न आणि निवाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या परिस्थितीत पूरग्रस्त कुटुंबांना केंद्रे यांनी सामाजिक सलोखा जपत आधार दिला.  
     पावसामुळे घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसानीबद्दल बोलताना केंद्रे यांनी ही वेळ धीर सोडण्याची नाही, तर एकजुटीने या संकटाचा सामना करण्याची आहे. आपण सगळे मिळून या परिस्थितीतून बाहेर पडू.जिल्ह्याचे नेते आमदार राणाजगजितसिंह पाटील व उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील जिल्हाध्यक्ष दत्ता भाऊ कुलकर्णी  व महायुती सरकार आपल्या पाठीशी आहे असे मत व्यक्त केले.
या प्रसंगी शालिनी वडगणे, एडके ताई  भंडारवाडी गावचे सरपंच सागर एडके, तुगांव येथील भाजपा तालुका चिटणीस सचिन लोमटे, आत्माराम बंडगर, बालाजी लवटे, दत्ता बनसोडे, श्रीराम एडके, संतोष साबळे, व गावातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक