स्वतःच्या वडिलांच्या मृत्यूच्या दुःखापेक्षा पूरग्रस्तांच्या दुःखांना मोठं समजणारा संवेदनशील मनाचा अधिकारी.. मा मैनक घोष
स्वतःच्या वडिलांच्या मृत्यूच्या दुःखापेक्षा पूरग्रस्तांच्या दुःखांना मोठं समजणारा संवेदनशील मनाचा अधिकारी.. मा मैनक घोष
राहुल कोरे आळणीकर
धाराशिव कालच आपल्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय मैनक घोष साहेब यांचे वडील कैलासवासी माणिकराव घोष यांचे आजाराने दुःखद निधन झाले. वडिलांना सुरुवातीला सिव्हिल हॉस्पिटल धाराशिव या ठिकाणी तपासणीसाठी नेण्यात आले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात आले परंतु आजारपणामुळे वडिलांचे दुःखद निधन झाले. घोष साहेब हे मूळचे पश्चिम बंगालचे रहिवासी असून त्यांनी वडिलांचा अंत्यविधी ज्या ठिकाणी त्यांचा कुठलाही संबंध नाही अशा सोलापूर या ठिकाणी उरकला. दुःखाचा कुठलाही देखावा न करता आदरणीय साहेब आज ठीक तीन वाजता वडगाव सिद्धेश्वर या ठिकाणी फुटलेल्या तलावाची पाहणी करण्यासाठी हजर झाले. धाराशिव जिल्ह्यामध्ये पावसाने थैमान घातले असून अनेक शेतकरी गोरगरिबांचे संसार देशोधडीला लागलेले असताना स्वतःचे दुःख बाजूला ठेवून हे अधिकारी थेट शेतकऱ्यांचे दुःख दूर करण्यासाठी त्या ठिकाणी हजर झाले हे सर्व पाहून साहेबांप्रती माझ्या मनामध्ये प्रचंड आदर निर्माण झाला आहे.
घोष साहेब हे एका अत्यंत सुसंस्कृत कुटुंबातील अधिकारी आहेत. साहेबांविषयी जिल्हा परिषदेमध्ये सर्व लोक खूप चांगल्या भावना व्यक्त करत असतात. एवढ्या उच्च पदावर असताना मोठ्या प्रमाणात डमडोल असताना सुद्धा साहेबांचा साधेपणा हा मनाला खूप भावणारा आहे. साहेबांचे हे सर्व वर्तन पाहून त्यांच्या कुटुंबीयांविषयी देखील आपल्या मनात आदर निर्माण होतो.
असा संवेदनशील व संस्कारक्षम अधिकारी धाराशिव जिल्हा परिषदेला लाभणं हे धाराशिव जिल्ह्यातील जनतेचे भाग्य आहे असे मला वाटते.अशा कर्तव्य दक्ष अधिकाऱ्यांना धाराशिव जिल्ह्यातील जनतेकडुन मनापासून सलाम.इतर अधिकाऱ्यांनी पण त्यांच्या कडून प्रेरणा घेऊन निःस्वार्थीपने काम काम करण्याची
Sir proud of You 🌹🙏🏼