धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार…एक तरुण, अभ्यासू आणि लोकांशी माणुसकीने वागणारा अधिकारी.
धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार…
एक तरुण, अभ्यासू आणि लोकांशी माणुसकीने वागणारा अधिकारी.
धाराशिव -अलीकडेच त्यांनी सर्वाधिक झाडं लावण्याचा विक्रम करून दाखवला.
नवीन संकल्पना सत्यात उतरवण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो आणि
सामान्य नागरिकांमध्ये मिसळून जाणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.
आज एका छोट्या व्हिडीओमुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली, पण हे विसरून चालणार नाही की
पुर, अतिवृष्टी किंवा कुठलंही संकट आलं तरी ते प्रथम रांगेत उभे राहून मदत करणारे अधिकारी आहेत.
एखाद्या क्षणी परंपरेत, संस्कृतीत रमणं हा गुन्हा नाही, उलट ते त्यांच्या मानवी आणि हळव्या बाजूचं दर्शन घडवतं.
मनापासून माफी मागणं ही त्यांची प्रामाणिकता दाखवते.
आजच्या काळात अशा तरुण, संवेदनशील आणि लोकाभिमुख अधिकाऱ्यांचीच समाजाला गरज आहे.
म्हणूनच आम्ही सांगतो –
“टीका नको, आधार द्या…
कारण कीर्ती किरण पुजार यांच्यासारखे अधिकारी जिल्ह्याचं भाग्य बदलू शकतात!”