*संघ शक्ती युगे युगे!!**शिक्षक एकता जिंदाबाद...* *अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ*टिईटी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल*
*संघ शक्ती युगे युगे!!*
*शिक्षक एकता जिंदाबाद...*
*अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ*
टिईटी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल*
*नवी दिल्ली-देशातील प्राथमिक शिक्षकांना (१ली ते ८वी) शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करणारा निकाल मा.सर्वोच्च न्यायालयाने १सप्टेंबर २०२५ निर्णयाने दिलेला आहे.यामुळे संपूर्ण शिक्षणक्षेत्रात खळबळ उडाली असून यामुळे देशभरातील लाखो शिक्षक प्रभावित झालेले आहे.*
*ज्यांची सेवा पाच वर्ष शिल्लक आहे त्यानांच फक्त सूट मिळाली असून बाकी शिक्षकांना दोन वर्षांत टिईटी करणे बंधनकारक केले आहे.*
*🌀या विषयी अखेल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने मा.पंतप्रधान व मा.शिक्षणमंत्री यांना जिल्हाधिकारी यांचे मार्फत निवेदन देवून सदरील प्रकरणी हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.तसेच लोकप्रतिनिधी यांना भेटुन निवेदन देण्यात येत आहेत.*
*🟣अखेर २५ सप्टेंबर पुर्वी याचिका दाखल-*
*सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर एक महिन्याच्या आत रिव्हिव पिटीशन दाखल होणे आवश्यक असते त्यानुसार दि. २५ सप्टेंबर २०२५रोजी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने मा.सर्वोच्च न्यायालयात "रिव्हिव पिटीशन" दाखल केली आहे.यासाठी माजी अँटनी जनरल मुकुल रोहतगी तसेच माजी सॉलिसिटर जनरल मा.संतोष हेगडे हे ख्यातनाम वकील शिक्षकाची बाजू मांडणार असल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष बसवराज गुर्रीकर तसेच राष्ट्रीय सचिव कमलाकांत त्रिपाठी यांनी सांगितले आहे.*
*🟣उत्तर प्रदेश शासनानंतर अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाची दुसरी याचिका मा.सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे.यावरून अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ नेहमीच कठीण काळात शिक्षकांसोबत असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे.*
*🟠राज्यातील शिक्षकांना आवाहन-*
*राज्यातील सर्व शिक्षकांना आवाहन करण्यात येते की आपण आपल्या नौकरी विषयी कोणतीही भिती बाळगू नये.शिक्षकांच्या व शिक्षणाच्या न्याय मागणीसाठी आपले हक्क आबादीत ठेवण्यासाठी संघटना कायम आपल्या सोबत आहे.संघटीत व्हा ,संघटनेवर विश्वास ठेवा शिक्षकांच्या अस्तित्वाच्या लढाईत सहभागी व्हा!!*
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
*❇️मा.देविदास बस्वदे-प्रदेश अध्यक्ष*
*❇️कल्याण लवांडे-राज्य सरचिटणीस*
*श्री.लालासाहेब मगर - राज्य उपाध्यक्ष*
*श्री.बशिर तांबोळी - जिल्हा अध्यक्ष*
श्री.अविनाश मोकाशे - जिल्हा सरचिटणीस
श्री.बाळासाहेब वाघमारे - जिल्हा कार्याध्यक्ष
श्री कैलास मोहिते कोषाध्यक्ष
श्रीमती सविता पांढरे महिला राज्य कार्यकारिणी सदस्य
श्रीमती अनिशा कदम महिला जिल्हाध्यक्ष
श्री राजेंद्र पवार न. प. जिल्हा प्रमुख
श्री दत्तात्रय मोहिते अपंग जिल्हाप्रमुख
श्री भोसले बी. आर. पदवीधर जिल्हाप्रमुख
श्री अरुण पाटील जिल्हा उपाद्यक्ष
श्री सचिन भांडे जुनी पेन्शन जिल्हा प्रमुख
*सर्व तालुका अध्यक्ष, तालुका सचिव व पदाधिकारी
* *अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ धाराशिव*