सरकार, पाहणी दौऱ्याच्या निमित्ताने शेतकऱ्यांची थट्टा करणं बंद करा.. होत नव्हतं तेव्हढ वाहून गेलंय, जीव वाहून गेलेत, आता उरलेली आशा तरी वाहून जाऊ देऊ नका!
सरकार, पाहणी दौऱ्याच्या निमित्ताने शेतकऱ्यांची थट्टा करणं बंद करा.. होत नव्हतं तेव्हढ वाहून गेलंय, जीव वाहून गेलेत, आता उरलेली आशा तरी वाहून जाऊ देऊ नका!
अतिवृष्टीमुळे झालेल्या प्रचंड नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेले राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांची खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर साहेब, आमदार प्रवीण स्वामी सर यांच्यासह उजनी येथे भेट घेतली..
यावेळी त्यांच्याकडे मागण्या केल्या की,
🔶 धाराशिव जिल्ह्यात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा..
🔶 सर्व निकष बाजूला ठेवून, पंजाब सरकारच्या धर्तीवर सरसकट एकरी २०,००० रुपये मदत शेतकऱ्यांना देण्यात यावी..
🔶 शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी तातडीने करावी..
🔶 अतिवृष्टीमुळे जमीन खरडून गेलेल्या बहुभूधारक शेतकऱ्यांना भरपाईच्या चौकटीत समाविष्ट करावे..
🔶 मृत व नुकसानग्रस्त पशुधनाची भरपाई बाजारभावानुसार दिली जावी..
🔶 उद्ध्वस्त झालेले रस्ते, पूल, तलाव, बंधारे, विजेचे खांब-रोहित्र यांच्या दुरुस्तीकरिता विशेष कार्यक्रम राबवावा..
🔶 पिकविमा योजनांच्या निकषात बदल करून ती शेतकऱ्यांसाठी परिणामकारक व उपयोगी करावी..
आज शेतकरी अडचणीत नाही तर पूर्ण उध्वस्त अवस्थेत उभा आहे.. ही वेळ फक्त दिलासा देण्याची नाही तर ठोस निर्णय घेऊन तातडीची मदत देण्याची आहे..