*एका आवारातील शाळांच्या एकत्रिकरणास अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचा विरोध*..

*एका आवारातील शाळांच्या एकत्रिकरणास अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचा विरोध*..
 
धाराशिव शिक्षणाधिकारी कार्यालय यांनी 2018 चा संदर्भ देऊन जिल्ह्यातील एका आवारातील अनेक शाळांचे एकत्रिकरण करण्यासंबंधीचे पत्र काढले आहे.. असे केल्यास अनेक चांगल्याप्रकारे चालत असलेल्या शाळा विस्कळीत तर होतीलच परंतू काही ठिकाणच्या स्वतंत्र कन्या शाळाच बंद पडण्याची भीती आहे.  व मुलींचे शिक्षण थांबणायची भीती वाटते,तसेच अगोदरच अतिरिक्त असलेल्या शिक्षक संख्येत भरमसाठ वाढ होऊन शिक्षकांची विविध पदे सहशिक्षक, पदवीधर, मुख्याध्यापक हे पदे आपोआपच कमी होऊन कायमची संपुष्टात येतील.. त्यामुळे हे पत्र ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे विशेषतः मुलींच्या शिक्षण व शिक्षक विरोधी असल्याची भावना व्यक्त करुन तसे निवेदन उपमुख्यकार्यकारी अधिकारी जि. प. धाराशिव श्री. अनंत भालके साहेब यांना दिले. 
  अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ धाराशिव या शिष्टमंडळात राज्य उपाध्यक्ष लालासाहेब मगर जिल्हाध्यक्ष बशीरभाई तांबोळी ,
जिल्हा सरचिटणीस अविनाश मोकाशे ,
जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब वाघमारे ,जिल्हा न. प. प्रमुख श्री. राजेंद्र पवार सर, महिला आघाडी प्रमुख सविता पांढरे मॅडम,जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भालेराव, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख शिवाजी साखरे,धाराशिव अध्यक्ष नागनाथ मुडबे तालुका नेते मिलिंद धावारे, प्रदीप तांबे, लक्ष्मण घोडके,मालोजी वाघमारे, सोमनाथ केवटे, सुनील चव्हाण ,रजनीकांत तुपारे, दिनेश पेठे, दत्तात्रय घेवारे *सर, हनुमंत माने, श्री नागटिळक इत्यादी* शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक