मुक्ताई पतसंस्थेतर्फे सामाजिक कार्यकर्ते व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
मुक्ताई पतसंस्थेतर्फे सामाजिक कार्यकर्ते व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
नायगांव (विकास वाघ) कळंब तालुक्यातील नायगांव येथिल मुक्ताई ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेतर्फे आयोजित भव्य सोहळ्यात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे कार्यकर्ते तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
आरोग्य जनजागृती, शैक्षणिक मदत, वृक्षलागवड, व्यसनमुक्ती, जैविक शेती आदी उपक्रमांत योगदान देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले. तर गुणवंत विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ व मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या सन्मानामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवीन ऊर्जा व प्रेरणा निर्माण झाल्याचे मान्यवरांनी मत व्यक्त केले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक पोलिस निरीक्षक धरणीधर बाबा कोळेकर (पो. स्टे. शिराढोण), सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण सोमवंशी (एटीएस धाराशिव), रामचंद्र अनुरथ समुद्रे (एम.डी.), भारती साहेब (पो. स्टे. शिराढोण) आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. स्वागत सत्कार, प्रास्ताविक, प्रमुख पाहुण्यांची मनोगते, विद्यार्थ्यांची व पालकांची भाषणे, सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार अशा विविध टप्प्यांतून सोहळा उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महादेव मेनकुदळे यांनी, सूत्रसंचालन आप्पासाहेब गोरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन महादेव लोकरे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परसराम गोरे, बाबासाहेब गायकवाड, नवनाथ पवार, नुर साहेब, मनोज शितोळे, गोविंद शितोळे, मेघराज गरड, छत्रगुण गरड, सोमनाथ गोरे, पंकज शितोळे, व्यंकट धाराशिवकर, नवनाथ गोरे, लखन मेनकुदळे आदींनी विशेष सहकार्य केले.