धाराशिव नगरपालिकेत पुन्हा महिलाराज! नीता अंधारे नव्या मुख्याधिकारीपदी

धाराशिव नगरपालिकेत पुन्हा महिलाराज! नीता अंधारे नव्या मुख्याधिकारीपदी

धाराशिव – धाराशिव नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी पुन्हा एकदा महिला अधिकाऱ्याची नियुक्ती झाली असून, नीता अंधारे यांची मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी त्या बीड नगरपालिकेत मुख्याधिकारी म्हणून कार्यरत होत्या.

सध्याच्या मुख्याधिकारी वसुधा फड यांची काही दिवसांपूर्वी बदली झाल्यानंतर ही जागा रिक्त होती. त्या रिक्त पदावर नीता अंधारे यांची नियुक्ती झाली आहे. त्यांच्या नियुक्तीने नगरपालिकेत पुन्हा ‘महिलाराज’ परतले आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे.

नीता अंधारे यांचा शासकीय प्रशासनातील अनुभव आणि कामातील पारदर्शकता पाहता धाराशिव नगरपरिषदेच्या कारभारात नवे सकारात्मक बदल होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक