*विठुनामाच्या गजरात दुमदुमले पंढरपुर! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा संपन्न*
*विठुनामाच्या गजरात दुमदुमले पंढरपुर! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा संपन्न*
पंढरपुरात आषाढी एकादशी महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी आणि उगले दाम्पत्यांच्या हस्ते पार पडली. मुख्यमंत्र्यांनी पांडुरंगाला साकडे घातले. तब्बल 20 लाख भाविक आजच्या दिवशी पंढरपुरात दाखल झाले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यंमंत्रीपदाच्या दुसऱ्या कार्यकाळात पहिल्यांदाच त्यांच्या हस्ते शासकीय पूजा पार पडली आहे. त्यांच्यासोबत मुलगी दिविजाही उपस्थित होती. 'आपल्या महाराष्ट्राचे आणि बळीराजाचे भले व्हावे' हे विठ्ठलाच्या चरणी साकडं मुख्यमंत्र्यांनी घातलं आहे. मुख्यमंत्र्यांसोबत पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य हे गेली 12 वर्षे वारी करत आहेत. नाशिक जिल्हातील नांदगाव येथील ते रहिवासी आहेत. कैलास उगले (52) हे शेतकरी असून त्यांचे वडील सेवानिवृत्त सैनिक आहेत.