जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांजा शाळेतील छोट्या वारकऱ्यांची जयघोष करत निघाली गावातुन दिंडी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांजा शाळेतील छोट्या वारकऱ्यांची जयघोष करत निघाली गावातुन दिंडी
धाराशिव - 'जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळा सांजा' या ठिकाणी दप्तरविना शाळा उपक्रमा अंतर्गत वृक्ष दिंडी,ग्रंथ दिंडी,वारकरी दिंडीचे मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजऱ्या करण्यात आल्या. याप्रसंगी सुरुवातीला ग्रंथ व वृक्षांचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.मुख्याध्यापकांनी ग्रंथांचे व वृक्षांचे आपल्या जीवनातील महत्त्व सांगितले एक मूल एक झाड याप्रमाणे वृक्षांचे वाटप करण्यात आले विद्यार्थ्यांनी आपल्या शेतात परसबागेत ,मोकळ्या अंगणामध्ये वृक्षारोपण करण्याकरिता वृक्षांचे वाटप करण्यात आले.यानिमित्त वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले भगवा ध्वज हाती घेऊन विद्यार्थ्यांनी जय जय राम कृष्ण हरी या तालावर टाळ- मृदंगाचा गजर केला.शाळेतील वारकरी वेशभूषेतील विद्यार्थिनींनी तसेच शिक्षक भगिनी व महिला पालक यांनी ही फुगडीचा फेर धरून उपस्थित पालकांची मने जिंकली.यावेळी उपस्थित महिला पालक यांनी ही टाळ मृदंगाच्या तालावर ठेका धरला.गावातील ग्रामस्थ पालकांनी वारकरी दिंडीचे जागोजागी अनोख्या पद्धतीने स्वागत करून,खाऊ व फळे वाटप करण्यात केली.ग्रंथदिंडीचे आयोजन केल्याने जागोजागी गावांमध्ये आपल्या जवळची जुनी वाचन्या योग्य पुस्तके शाळेस भेट दिली.
वारी आली वृक्षाची, दिंडी चालली वृक्षारोपणाची
वारी आली ग्रंथांची, दिंडी चालली ज्ञानाची
वारी आली वारकऱ्यांची, दिंडी चालली भक्तीची
विद्यार्थ्यांनी वृक्षदिंडी ग्रंथदिंडी काढून वृक्षारोपणाचा गावकऱ्यांना अनोखा संदेश दिला.
व शेवटी विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात आरती करून ग्रंथदिंडी, वृक्षदिंडी ,व वारकरी दिंडीची सांगता करण्यात आली.या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक श्री राजाभाऊ पडवळ,श्री.रणजीत कदम श्री.श्यामसुंदर तनमोर ,श्री.सच्चिदानंद उंबरे सर श्रीमती. विमल मक्तेदार श्रीमती.वसुधा कुलकर्णी, सह शिक्षक श्री. साहेबराव जगदाळे, श्री.श्रीराम पंजरकर श्रीमती.शोभा सलगर ,कल्पना घायाळ,अनिता डोंगरे, सलोकता दारफळकर ,दीपाली जाधव,अनुराधा मरगणे,माध्यमिक तासिका तत्वावर नियुक्त असलेले शिक्षक श्रीयुत. श्री.लक्ष्मण भोंग, श्रीम.अंजली सूर्यवंशी . शालेय पोषण आहार कार्यकर्ती सबिया मुलाणी, रुकसाना शेख उपस्थित होते.