पवनचक्की कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना मारहाण.

पवनचक्की कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना मारहाण.
 आठ दिवसांपूर्वीच वाशी येथे वीज निर्मिती प्रकल्प येथे मारहाणीचा प्रकार व गाड्या फोडण्याचा प्रकार ताजा असतानाच. लोहारा  तालुक्यातील धानोरी गावामध्ये पाच ते सहा जणांकडून पवनचक्की कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आलेले आहे. यामध्ये पवनचक्की कर्मचारी यांच्या हात पाय व डोक्याला मार लागलेला आहे.
 धाराशिव जिल्ह्याचा बीड जिल्हा होत आहे का अशी चर्चा ग्रामीण भागामध्ये रंगत आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये नव्याने वीज निर्मिती  चे प्रकल्प मोठ्या प्रमाणामध्ये उभा होत आहेत. या प्रकल्पामध्ये काही अपवाद वगळता काही शेतकऱ्यांच्या समस्या वगळता धाराशिव जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी पवनचक्की उभा राहिलेले आहेत व त्यातून वीज निर्मिती होऊन शासकीय सब स्टेशनला ही वीज निर्मिती पुरवठा केली जात आहे. या प्रकल्पामध्ये शेतकऱ्याचा जमिनीचा मोबदला त्याचबरोबर शिवारातील सर्व रस्ते वीज निर्मिती प्रकल्पांमुळे मुरूम टाकून पक्के करण्याचे काम चालू आहे. यामध्ये काही शेतकऱ्यांना शेताकडे जाण्याचा मार्ग देखील मोकळा झालेला आहे.
 या वीज निर्मिती प्रकल्पामध्ये भारताच्या कानाकोपऱ्यातून वीज निर्मिती प्रकल्पामध्ये काम करण्यासाठी टेक्निकल कर्मचारी हे सतत वीज निर्मिती प्रकल्पाकडे ये जा करत आहेत. असे असताना नोकरीसाठी इथे आलेल्या लोकांना काही गावगुंडांकडून मोठ्या प्रमाणामध्ये त्रास सहन करावा लागत आहे. दारू पिऊन गाडी अडवणे शिवीगाळ करणे धमकी देणे मारहाण करणे त्यांचा पाठलाग करून त्यांना भीती घालणे असे अनेक प्रकार धाराशिव जिल्ह्यामध्ये सध्या पाहायला  मिळत आहेत. या सर्व वातावरणामुळे वीज निर्मिती प्रकल्पातील पवनचक्की कंपनीचे कर्मचारी यांच्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे. यावरती प्रशासनाने कडक कारवाई करायची गरज आहे. अपवाद वगळता काही शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. व काही शेतकऱ्यांना मिळालेला मावेजा हा समाधानकारक आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जागतिक लेव्हलच्या कंपन्या येऊन मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक होत आहे ही खरी आनंदाची बाब आहे परंतु या वीज निर्मिती प्रकल्पावर होणारा त्रास येथे निर्माण होणारी कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती यामुळे उर्वरित प्रकल्प पूर्ण होईल की दुसऱ्या राज्यात जाईल याचीही शंका या ठिकाणी निर्माण होत आहे.
 धानोरी येथे पवनचक्की कर्मचाऱ्याला झालेली मारहाण ही टाटा पॉवर कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण झालेले आहे. आपल्या भारत देशामध्ये टाटा पावर ही उत्कृष्ट कंपनी आहे. या कंपनीच्या लोकांना मारहाण होणे ही देखील आश्चर्याची गोष्ट आहे.
 यावरती प्रशासनाने कठोर कारवाई करून अशा मारहाण करणाऱ्या गावगुंडांना मोका अंतर्गत कारवाई करावी अशी कंपनीकडून मागणी होत आहे. या प्रकरणात जर प्रशासनाने कडक कारवाई केली नाही तर महाराष्ट्र राज्याची गृहमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे शिष्टमंडळ भेट घेऊन संपूर्ण तक्रार करणार आहेत.
 या प्रकल्पांना पोलीस प्रोटेक्शन देण्यात यावं अशी मागणी या ठिकाणी होत आहे. वाढीव मोबदला चे जे विषय आहेत त्यामध्ये प्रशासकीय स्तरावरती जो काही निर्णय होईल हे वीज निर्मितीचे प्रकल्प उभा करणाऱ्या कंपन्या स्वीकाराला तयार आहेत. परंतु खरंच आपल्या धाराशिव जिल्ह्याचा देखील इथे बीड होत आहे का अशी शंका ग्रामीण भागामध्ये होत आहे.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक