राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मारक समितीच्या वतीने धाराशिव येथे शाहू महाराज जयंती साजरी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मारक समितीच्या वतीने धाराशिव येथे शाहू महाराज जयंती साजरी
 धाराशिव दि. २६ 

 राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मारक समिती धाराशिव आयोजित मध्यवर्ती राजर्षी शाहू महाराज जयंती महोत्सव समिती 2025 च्या वतीने दिनांक 26 जून 2025 रोजी राजर्षी शाहू महाराज यांची जयंती राजर्षी  छत्रपती शाहू महाराज चौक धाराशिव येथे मोठ्या उत्साहात साजरी केली.
  जयंतीनिमित्त चौकात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. बलराज रणदिवे, कुणाल निंबाळकर यांच्यासह अनेकांनी रक्तदान केले.
 धाराशिव चे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सचिन कवले, प्रा.कॅप्टन बुबासाहेब बागल,भाजपा जिल्हाध्यक्ष दत्तात्रय कुलकर्णी, शिवसेना शहराध्यक्ष सोमनाथ गुरव, राष्ट्रीय काँग्रेस तालुकाध्यक्ष विनोद वीर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे डॉ.प्रतापसिंह पाटील, भाई उद्धवराव पाटील शिक्षक पतसंस्थेचे सचिव अमरसिंह देशमुख, राजसिंह राजेनिंबाळकर नितीन मसाप चे अध्यक्ष नितीन तावडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
 प्रारंभी मान्यवरांनी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून पुष्प अर्पण केले.
 यावेळी  बाबासाहेब बागल,दत्तात्रय कुलकर्णी, सोमनाथ गुरव, डॉ. प्रतापसिंह पाटील, प्रा. रवी सुरवसे, सुदेश माळाळे, जयवंत ओमने, मयूर काकडे,शाहू महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष बलराज रणदिवे यांनी शाहू महाराज यांच्या विषयी  मार्गदर्शन केले. शाहू महाराज स्मारक उभारण्यास सकारात्मक पावले उचलू असे मान्यवरांनी भाषणात विचार व्यक्त केले.
 समता दल सैनिकांनी मानवंदना दिली.
 कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाहू महाराज स्मारक समितीचे सचिव बालाजी तांबे यांनी तर सूत्रसंचालन माजी नगरसेवक पृथ्वीराज चिलवंत यांनी केले. उपस्थितांचे आभार नंदकुमार गवारे यांनी मानले.
 या कार्यक्रमास धर्मवीर कदम, भा.न. शेळके, ॲड. सरफराज काजी, संजय घोडेराव,राहुल माकोडे, प्रवीण कोकाटे, काकासाहेब खोत, रोहित पडवळ, अक्षय नाईकवाडी, मुकुंद घाडगे,नारायण तूरूप, विजय गायकवाड, ॲड. अजित कांबळे,संदीप घोडके,सौदागर माळी, अक्षय राऊत, संदीप शिंदे, राजेंद्र धावारे,शीला उंबरे, संगीता काळे,महादेव माळी, बापू शिंदे,सचिन लोमटे,सुरेश शेळके, रमाकांत हाजगुडे, ॲड.  तस्लिम काझी,कुणाल निंबाळकर, रवी माळाळे, महेश भगत, प्रदीप सूर्यवंशी, हरिभाऊ बनसोडे,दगडू सोनटक्के, सुशील गडकर,अविनाश सरवदे, अंगद हाजगुडे, आरिफ शेख,समता दल सैनिक नामदेव वाघमारे, सचिन दिलपाक,जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष मयूर काकडे,उपाध्यक्ष आकाश मुंडे,बिलाल रजवी, विनोद निंबाळकर,सचिव अभिजीत सूर्यवंशी, मुकुंद घाडगे, सहसचिव सुनील जाधव, संघटक अमर माळी, सहकोषाध्यक्ष डेबो चिलवंत,संभाजी फरताडे, प्रसिद्धी विभाग आशिष साळुंके, आदी सह अनेक जणांची उपस्थिती होती.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक