शिवसेना नेते नितीन शेरखाने यांचा असंख्य समर्थकांसह भाजपात प्रवेश ; आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या उपस्थितीत भव्य पक्षप्रवेश

शिवसेना नेते नितीन शेरखाने यांचा असंख्य समर्थकांसह भाजपात प्रवेश ; आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या उपस्थितीत भव्य पक्षप्रवेश
धाराशिव (प्रतिनिधी) – शिवसेना (ऊ.बा.ठा.)पक्षाचे नेते तथा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष नितीन बप्पा शेरखाने यांनी असंख्य समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. धाराशिव येथील भाजपा कार्यालयात हा भव्य पक्षप्रवेश समारंभ पार पडला. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि नव्याने नियुक्त झालेले जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी प्रमुख उपस्थित होते.

नेतृत्वावर विश्वास

पक्षप्रवेशानंतर नितीन शेरखाने यांनी सांगितले, “शिवसेनेत निर्माण झालेल्या अस्वस्थतेमुळे आम्हाला निर्णय घ्यावा लागला. कार्यकर्त्यांची घुसमट वाढली आहे. भाजपामध्ये कार्यकर्त्याला मान आहे, विकासाचे आणि संवादाचे खुले दार आहे.”
त्याचवेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सर्व नवप्रवेशित कार्यकर्त्यांचे स्वागत करत स्पष्ट केले की, “या पक्षात कोणताही कार्यकर्ता उपेक्षित राहणार नाही. सर्वांना समान संधी मिळेल.”
जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी आपल्या सर्वसमावेशक नेतृत्वाचा प्रत्यय देत सांगितले की, “पक्ष बळकट करण्यासाठी सर्व कार्यकर्ते हेच भाजपाचे खरे बळ आहेत. कोणालाही दुय्यम वागणूक मिळणार नाही. पुढे आणखी बरेच मोठे बदल होणार आहेत.”

राजकीय हालचालींना वेग

या पक्षप्रवेशामुळे धाराशिव शहर आणि परिसरात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. भाजपाच्या नेतृत्वावर वाढलेला विश्वास, स्थानिक नेत्यांची कार्यपद्धती, आणि कार्यकर्त्यांतील असंतोष या साऱ्यांचा परिणाम म्हणून हा मोठा पक्षप्रवेश घडून आला आहे. यामुळे आगामी काळात अजून अनेक कार्यकर्ते भाजपा प्रवेश करण्याची शक्यता असल्याचे जाणकारांचे मत आहे.

पक्षप्रवेश केलेल्या समर्थकांची नावे
अनिल शेरखाने, देविदास शेरखाने, संपत शेरखाने, पद्माकर शेरखाने,साहेबराव शेरखाने, शंतीनाथ शेरखाने, नवनाथ कांबळे, अविनाश देविदास शेरखाने, प्रमोद शेरखाने, कुणाल शेरखाने, सुधाकर केसकर, मोनु सुडके, पप्पू माळी, किरण शेरखाने, दादाराव शेरखाने, देविदास वाघमारे, तुकाराम वाघमारे, धोंडीराम वाघमारे,  संपत शिवाजी शेरखाने, सुधाकर शेरखाने, नामदेव वाघमारे, प्रेम शेरखाने, प्रतीक शेरखाने, रोहित शेरखाने, डॉ. सत्यविजय शेरखाने, अनिकेत शेरखाने, किशोर वाघमारे, निलेश वाघमारे, राजू सातपुते सर, राजेंद्र रोकडे, दीपक नाईकनवरे, संपत सुतार, पांडुरंग सुतार, प्रशांत कांबळे, विशाल कांबळे, मच्छिंद्र कांबळी, शेख फारुख, अयुब शेख, सुधाकर शेरखाने, रणजित उकिरडे, अनंत काळे, दत्ता पवार, राज सुरावसे, संदीप पवार, अक्षय गाडे, शिवम शेरखाने, योगेश सुदके, सुनील सुदके, सुनील शेरखाने, संजय शेरखाने, पांडुरंग कांबळे, खायुम शेख, अमजद शेख, सचिन लोंढे, सुदेश, विर्गत, संदीप गिराम, दीपक पटे, अमोल लोहार, नितीन भोसले, बापू वाघमारे, पृथ्वीराज पाटील, राज कांबळे, हनुमंत गायकवाड आदींचा यामध्ये समावेश आहे.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक