पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास (काका) घुगे यांचा सेवानिवृत्ती समारंभ भावनिक वातावरणात संपन्न

पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास (काका) घुगे यांचा सेवानिवृत्ती समारंभ भावनिक वातावरणात संपन्न
धाराशिव (प्रतिनिधी) – जिल्हा विशेष शाखा, धाराशिव येथे कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास (काका) घुगे हे दिनांक ३० जून २०२५ रोजी वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांच्या प्रदीर्घ व यशस्वी सेवा कार्याचा गौरव करण्यासाठी जिल्हा विशेष शाखा, धाराशिव यांच्यातर्फे सेवानिवृत्ती सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात सहकाऱ्यांनी कृतज्ञतेच्या भावना व्यक्त करत त्यांना भावपूर्ण निरोप दिला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक आमोद भुजबळ होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि नवनाथ होमकर, सपोनि श्रीमती अश्विनी जाधव, पो.उ.नि. प्रदीप सांळुके, बाळासाहेब दळवी, इरशाद हक्क, सपो.उ.नि. किरण डोके, पोह. उपेंद्र कुलकर्णी, किरण मुंडे, महेश कचरे, योगेश सुर्यवंशी, गोविंद पवार, नितीन पोतदार, तन्वीर पिरजादे, विशाल बिदे, गणेश रोडे, म.पो.ह. विमल साळुंके–कचरे, सुरय्या पठाण, सारिका जाधव, रिटे मॅडम यांच्यासह अनेक सहकारी उपस्थित होते.

 घुगे यांनी दिनांक १ ऑगस्ट १९८७ रोजी परभणी जिल्हा पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून सेवा सुरू केली. त्यांच्या तीन दशकांहून अधिकच्या सेवाकाळात त्यांनी परभणी पोलीस दलात ADS, वाहतूक शाखा, कळमनुरी पोलीस ठाणे येथे काम पाहिले. त्यानंतर धाराशिव जिल्हा पोलीस दलात उमरगा, धाराशिव शहर, बेंबळी पोलीस स्टेशन, LCB, DSB, तसेच मंदिर चौकी तुळजापूर आणि ATS छत्रपती संभाजीनगर येथे विविध पदांवर कार्यरत राहत त्यांनी प्रामाणिकपणे कर्तव्य बजावले.

त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी त्यांना पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याकडून सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे. घुगे हे केवळ एक कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकारीच नव्हे, तर उत्तम हॉलीबॉल खेळाडू म्हणूनही ओळखले जातात. त्यांनी सेवाकाळात सामाजिक जाणिवा जोपासत संयमी, विनम्र आणि सहकार्यशील वृत्ती ठेवली.

कार्यक्रमात त्यांचा आणि त्यांच्या सौ. पत्नींचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. अनेक सहकाऱ्यांनी त्यांच्यासोबतच्या आठवणी शेअर करत कृतज्ञता व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी उपस्थित सर्वांनी घुगे यांना पुढील सुखी, निरोगी आणि समाधानी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक