*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आळणी ता. धाराशिव येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा*

*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आळणी ता. धाराशिव येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा*
आळणी (ता. धाराशिव) :
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आळणी येथे २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात शाळेतील एकूण २७९ विद्यार्थी सक्रियपणे सहभागी झाले होते.

कार्यक्रमाची सुरुवात योगाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने करण्यात आली. यानंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री. बशीर तांबोळी यांनी विद्यार्थ्यांना विविध योगासने शिकवली. त्यांनी सूर्यनमस्कार, प्राणायाम, ताडासन, भुजंगासन, वज्रासन, वक्रासन यासारखी मूलभूत पण प्रभावी योगासने सादर करून विद्यार्थ्यांना त्याचे महत्त्व समजावून सांगितले.

या वेळी श्री. हनुमंत माने, श्री. उत्तम काळे आणि श्री. दिनेश पेठे यांनी देखील योगासनांचे सादरीकरण करत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनी संपूर्ण मनोभावे योग सत्रात सहभाग घेतला.

शाळेच्या सुंदर आवारात झाडांच्या सानिध्यात , स्वच्छतेची काळजी घेत योग दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमात योगाचे शारीरिक व मानसिक आरोग्यावर होणारे फायदे विशद करण्यात आले.

शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षकवर्ग आणि पालकांनीही कार्यक्रमाची प्रशंसा केली. यशस्वी आयोजनासाठी संपूर्ण शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक