सनी पवार उतरले मैदानात...
'सनी पवार उतरले मैदानात...
शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या धाराशिव शहराचे प्रमुख असलेले 'सनी' मागील दीड ते दोन वर्षांपासून पक्षात नाराज होते. कोणता 'झेंडा' घेवू हाती, अशी त्यांची अवस्था झाली होती. अखेर त्यांनी 'कमळ' हाती घेतले अन् दुसऱ्याच दिवसापासून ते आपल्या प्रभागात सक्रीयही झाले. "जिव्हाळ्याची साथ... अपुलकीचा संवाद" अशी टॅगलाईन वापरत त्यांनी जनतेपर्यंत जाण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. वॉर्डातील स्वच्छता, दिवाबत्ती यासारखे प्रश्न ते मार्गी लावू लागले आहेत.