*शिवसेना शहर प्रमुखपदी आकाश कोकाटे यांची निवड*

*शिवसेना शहर प्रमुखपदी आकाश कोकाटे यांची निवड* 
धाराशिव -
शिवसेना पक्षाच्या धाराशिव शहर प्रमुखपदी आकाश मिलींदराव कोकाटे यांची निवड करण्यात आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही निवड महत्त्वाची मानली जात आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार व पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या मान्यतेने
शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांनी ही निवड केली आहे. 

पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या हस्ते निवडीचे पत्र आकाश कोकाटे यांना देण्यात आले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार या पदाच्या माध्यमातून करावा, तसेच पक्षाचे संघटन वाढविण्यासाठी कार्य करावे असे नियुक्तीपत्रात म्हटले आहे. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके, शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आकाश कोकाटे यांनी धाराशिव शहर आणि परिसरात शिवसेना पक्ष वाढीसाठी मोठे प्रयत्न केले आहेत. शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांच्यासोबत काम करत असताना त्यांनी कार्यकर्त्यांची मोट बांधून पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला बळकटी देण्याचे काम सतत करत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन ही निवड करण्यात आली आहे. या निवडीचे तमाम शिवसैनिकांमधून स्वागत होत आहे.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक