धाराशिव जिल्ह्यात केंद्रीय विद्यालयाचा परिपूर्ण प्रस्ताव केंद्राकडे त्वरित पाठवाखासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर


धाराशिव जिल्ह्यात केंद्रीय विद्यालयाचा परिपूर्ण प्रस्ताव केंद्राकडे त्वरित पाठवा

खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर

 

      धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात आज केंद्रीय विद्यालय स्थापनेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक जिल्हाधिकारी कार्यालय येथे ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. आकांक्षित जिल्हा म्हणून घोषित झालेल्या धाराशिवमध्ये केंद्र शासनाच्या मानकांनुसार गुणवत्तापूर्ण शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय विद्यालय स्थापनेसाठी प्रशासनाकडून सकारात्मक पावले उचलण्यात येत आहेत. खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी धाराशिव जिल्ह्यासाठी केंद्रीय विद्यालय स्थापन करणे करिता शिक्षण मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे विनंती केली होती तसेच लोकसभेच्या अधिवेशन काळामध्ये या संदर्भामध्ये तारांकित प्रश्न विचारण्यात आला होता या अनुषंगाने केंद्रीय विद्यालय संघटन यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला होता.

         या बैठकी धाराशिवचे लोकप्रतिनिधीखासदार श्री. ओमराजे निंबाळकर यांनी धाराशिव जिल्ह्यासाठी केंद्रीय विद्यालयाची निकड अधोरेखित केली असूनया शाळेमुळे जिल्ह्यातील विद्यार्थी आणि पालक यांना मोठा दिलासा मिळेलअसे मत व्यक्त केले. त्यांनी केंद्र शासनाच्या पातळीवर प्रस्ताव त्वरित मंजूर होण्यासाठी आवश्यक पाठपुरावा करण्याचे आश्वासनही दिले.

         या बैठकीत जिल्ह्यातील विविध ठिकाणची संभाव्य शासकीय व निमशासकीय जागा तपासून त्यातील योग्य ठिकाण निश्चित करण्याचा विचार विनिमय करण्यात आला. तसेच केंद्रीय विद्यालय संघटनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रस्ताव तयार करून त्वरित केंद्र शासनाकडे पाठविण्याची कार्यवाही करण्यावर भर देण्यात आला. या बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी श्री. शिरीष यादवनिवासी उपजिल्हाधिकारी सौ. शोभा जाधव यांच्यासह ,सार्वजनिक बांधकाम विभागशिक्षण विभागनगरपरिषदमहसूल विभाग यांच्यासह इतर संबंधित अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

    प्रस्तावित केंद्रीय विद्यालयामुळे केंद्र व राज्य शासनाच्या विविध खात्यांतील अधिकारीकर्मचारी तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी प्राप्त होणार असूनजिल्ह्याच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासाला चालना मिळेलअसा विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक